महाराष्ट्र
Trending

पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाचेच्या जाळ्यात ! धाराशिवच्या पथकाची बीड जिल्ह्यात कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी पंचायत समितीचा विस्तार अधिकारी यास १० हजारांची लाच घेताना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

जयेश मुकुंद भुतपल्ले (वय 36 वर्षे, विस्तार अधिकारी, कृषी, वर्ग -3, पंचायत समिती, पाटोदा) असे आरोपीचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी आरोपी जयेश भुतपल्ले यांनी दिनांक 06.09.2023 रोजी पंचांसमक्ष 10,000/- रुपये लाच रकमेची मागणी केली होती. आज दि.05.10.2023 रोजी 10,000/- लाच रक्कम आरोपी जयेश भुतपल्ले यांनी पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली. आरोपी जयेश भुतपल्ले यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ठाणे पाटोदा जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई यांच्या संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी -नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. धाराशिव, सापळा पथक – पोलीस अंमलदार – विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, दत्तात्रेय करडे यांनी पार पाडले.

Back to top button
error: Content is protected !!