महाराष्ट्र
Trending

खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रॉसिटी: ‘औकात नसताना SC, ST चे अधिकारी रुग्णालयात येत आहेत, हे मागासवर्गीय डॉक्टर माजले ! फुकटचा पगार घेतात, त्यांनी शौचालय साफ करायला पाहिजे’ !!

खासदार हेमंत पाटील यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा फिर्यादीचा तक्रारीत आरोप, खासदारांनी आरोप फेटाळले

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – शिवसेना शिंदे गटाचे हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव वाकोडे (अधिष्ठाता डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड) यांना रुग्णालयाचे शौचालय साफ करायला लावले. यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘औकात नसताना SC, ST चे अधिकारी रुग्णालयात येत आहेत, हे मागासवर्गीय डॉक्टर माजले. फुकटचा पगार घेतात, त्यांनी शौचालय साफ करायला पाहिजे अशी अपमानास्पद वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. दरम्यान, हे आरोप खासदारांनी फेटाळून लावले आहेत.

यासंदर्भात फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, फिर्यादी हे डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे दि. 22/5/2023 पासून अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. दि. 3/10/2023 रोजी फिर्यादी सकाळी 09.00 वा. सुमारास कार्यालयामध्ये आले असता वरिष्ठ अधिकारी राजीव निवतकर (आयुक्त वैद्यकीय शिक्षण व मा. मंत्री वैद्यकीय शिक्षण यांचा शासकीय दौरा रुग्नालयामध्ये असल्यामुळे फिर्यादी वार्डातील व कार्यालयातील कामकाज करत होते. यावेळी वेगवेगळे राजकीय व सामाजीक कार्यकर्ते हे कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी येत होते. दि. 3/10/2023 रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास खासदार हेमंत पाटील व त्यांच्या सोबत 10 ते 15 इतर लोक व काही प्रेस रिपोर्टर घेवून फिर्यादीच्या शासकीय कॅबिनमध्ये आले व त्यांना एकदम रागाने खुर्चीतून उठण्यास सांगितले व अचानक पूर्व सूचना न देता कॅबीनमध्ये जनसमुदायसह घुसून दहशदीचे वातावरण निर्माण केले.

यामुळे फिर्यादी भयभीत होवून मानसिक तनावग्रस्त स्थितीमध्ये त्यांच्या खुर्चीतून उभे राहून बाजुला सरकले. तेव्हा खासदार हेमंत पाटील हे गैरकायदेशीर फिर्यादीच्या खुर्चीवर बसले व फिर्यादी व त्यांच्या पदाचा अवमान केला. फिर्यादीच्या कॅबीनमध्ये खासदार हेमंत पाटील त्यांच्या सोबतचे सहकारी जोर जोरात बोलुन शासकीय कर्तव्यात अडथळा निर्मान करत होते व रुग्नालयात झालेल्या मृत्यू संबंधी विचारणा करीत होते. त्यामुळे फिर्यादीला मानसीक त्रास झाला. त्यानंतर त्यांनी जेथे मृत्यू झाले त्या वार्डाला भेट द्यायची म्हणून वार्ड दाखवण्यासाठी जातांना फिर्यादीच्या कार्यालयाच्या बाहेर बाथरुम किंवा संडास कोठे आहेत ते मला पाहायचे आहेत असे म्हणुन फिर्यादीला शौचालय रुम दाखवण्यास सांगितले. फिर्यादीनी त्यांच्या म्हणण्या प्रमाणे शौचालय रुम दाखविली.

त्यावेळेस फिर्यादीच्या कार्यालयाचे कर्मचारी सुद्धा सोबत होते. फिर्यादीने शौचालय रुम उघडून दाखवताच हे शौचालय घान कसे ? आणि हे शौचालय तुम्ही साफ करा असे म्हणून फिर्यादीला धमकावले. कार्यालयातील वर्ग चार कर्मचारी समोर येवून ते शौचालय आम्ही साफ करतो असे म्हणाले असता त्यांनी त्यास पुढे न येवू देता तुझ्या साहेबांना असे काम करायला पाहिजे ते फुकट पगार घेतात व त्यांनीच हे साफ करायला पाहिजे. असे म्हणून धमकावून तेथे फिर्यादीला जबरदस्तीने शौचालय साफ सफाई करण्यास लावले. त्यांच्या सहकार्याने मीडिया, प्रेस यांना फिर्यादीचे चित्रीकरण करायला लावले व फिर्यादीची मानहानी करण्यासाठी मी शौचालय साफ करीत असल्याची बातमी सर्व प्रसार माध्यमातून प्रसारीत केली.

खासदार हेमत पाटील व त्यांच्या व संबंधीत प्रेस रिपोर्टर यांनी अनाधीतकृतपणे माझ्या कार्यालयात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण करून दहशतीचे वातावरण निर्माण करून फिर्यादीला सार्वजनीक ठीकाणी शौचालय साफ करण्याचे काम बळजबरीने करावयास लावले. यामुळे फिर्यादीची सार्वजनीक ठीकाणी अवहेलना केल्याने मानसिक छळ होवून त्यांना त्रास झाला. शौचालय बळजबरीने साफ करावयाला लावलेले वृत न्युजमध्ये प्रसिध्द केल्याने कुटूंबीय व फिर्यादीची जनमानसात बदनामी झाली.

फिर्यादीला शौचालय साफ करताना पाहून त्यांचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी डोळ्यात आश्रु आणून फिर्यादीच्या हातातील झाडु घेवुन आम्ही शौचालय साफ करतो असे म्हणत असताना खासदार हेमंत पाटील यांनी व त्यांच्या सहकार्यानी दृष्ट भावनेने शौचालय हाच साफ करेल असे अपमानस्पद बोलत होते. या शासकीय रुग्नालयात SC, ST चे अधिकारी यांची औकात नसताना येत आहेत, मी यापूर्वी एका SC च्या डॉक्टरला सुद्धा असेच काम करायला लावले होते. हे मागास वर्गीय डॉक्टर माजले आहेत अशा अर्वाच्च भाषेत ते शिवीगाळ करत होते.

त्यानंतर वार्ड क्र. 6 येथे नेवून फिर्यादीकडून सदरील वार्डातील शौचालयाची जबरदस्तीने साफसाफई करून घेतली व अपमानीत केले. खासदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेचे कार्यरत खासदार असून त्यांच्या पासून व त्यांच्या कार्यकर्त्यांपासून फिर्यादी व त्यांच्या कुटूंबीयाच्या जीवीतास धोका असल्याचे प्रथम माहिती अहवालात म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!