फुलंब्री
Trending

फुलंब्री तालुक्यातील पाणवाडी पाण्याच्या टाकीवर पाच किटकनाशकाच्या बाटल्या सापडल्या ! पाण्यात विष कालवण्याचा प्रयत्न, डाव नगरपंचायतने हाणून पाडला, एक भरलेली व चार रिकाम्या बाटल्या जप्त !!

फुलंब्री नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष व सतर्क कर्मचारी जमीर सुभान शेख यांच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- फुलंब्री तालुक्यातील पाणवाडीला पाणी पुरवाठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर पाच किटकनाशकच्या बाटल्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फुलंब्री नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष व सतर्क कर्मचारी जमीर सुभान शेख यांच्या निदर्शनास या किटकनाशकच्या बाटल्या येताच त्यांनी पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी त्या बाटल्या जप्त केल्या. किटकनाशकच्या एकूण पाच बाटल्या मिळून आल्या. त्यातील एक बाटली भरलेली तर चार रिकाम्या होत्या. सुमारे ३ हजार लोकसंख्येच गाव असलेल्या पाणेवाडीतील ग्रामस्थांनी सध्या सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या घटनेमागचा सूत्रधार कोण ? याचा तपास पोलिस घेत आहे. दरम्यान, टाकीतील पाणी टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते त्याचा रिपोर्ट पिण्यायोग्य असा आला असून ग्रामस्थांनी घाबरून जावू नये, असे आवाहन फुलंब्री नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

जमीर सुभान शेख (वय23 वर्षे व्यवसाय नोकरी रा- पानवाडी ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते नगरपंचायत कार्यालय फुलंब्री येथे पाणी पुरवठ्याचे कामकाज करतात. जमीर सुभान शेख व हमीर हमजा दाऊद शेख हे नगरपंचयात फुलंब्री पाणी पुरवठा विभागात काम करतात. या दोघांकडे पाणवाडी येथे पाणी सोडण्याचे काम आहे.

पाणवाडी पाणीपुरवठा करिता सांजुळ धरणामध्ये विहीर खोदलेली आहे. तेथून पाणवाडी करिता पाणीपुरवठा होतो. पाणवाडी येथे पाणी साठवण्यासाठी दोन टाक्या एक 40 हजार लिटर तर दुसरी 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. त्या टाक्या जमीर सुभान शेख व त्यांचे सहकारी हे दिवस भर मोटार लावून पाण्याने भरून ठेवतात व रोज सकाळी सात वाजता गावामध्ये पाणी सोडत असतात.

दिनांक 22/09/20023 रोजी सकाळी 07.00 वाजेच्या सुमारास जमीर सुभान शेख व हमीर हमजा दाऊद शेख हे दोघे पाणवाडी येथील पाण्याच्या टाकीवर गावामध्ये पाणी सोडण्यासाठी गेले असता. त्यांना पाण्याच्या टाकीवर शेतात वापरण्याच्या पाच किटकनाशकाच्या बाटल्या दिसल्या. त्यांनी तातडीने ही माहिती पाणी पुरवठा अधिकारी गजानन तावडे यांना दिली. त्यामुळे पाणी पुरवठा अधिकारी, मुख्यकार्यकारी हे अधिकारी आले.

त्यानंतर फुलंब्री येथील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी हे सुध्दा तेथे आले. त्यांनी टाकीवर पाहणी केली व टाकीवर पडलेल्या किटकनाशकच्या बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. सदरील किटकनाशकाच्या बाटल्या पाण्यात टाकून ते पाणी विषारी व्हावे व त्या विषारी पाण्यामुळे गावातील लोकांचे जिवाला धोका व्हावा असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला म्हणून सदरील किटकनाशकाच्या बाटल्या ठेवणार्या अज्ञात व्यक्तीवर कायदेशिर कारवाईची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!