छत्रपती संभाजीनगर
Trending

सावंगी केंब्रिज बायपासवर मिनी स्कूल बस व कारचा भीषण अपघात, हर्सूलचा चालक ठार ! विद्यार्थ्यांना सावंगीत सोडून निघालेल्या मिनी स्कूल बसवर काळाचा घाला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – सावंगी ते केंब्रिज बायपास रोडवर मिनी स्कूल बस व स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात होवून मिनी बस चालकाचा मृत्यू झाला. सावंगी येथील साई कल्याणी सोसायटीत विद्यार्थ्यांना सोडून निघालेली मिनी स्कूल बस व सावंगीकडे येणार्या कारमध्ये हा अपघात झाला. डोक्यास व छातीला जोराचा मार लागल्याने मिनी स्कूल बस चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना दुनाखे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतू डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विलास उत्तमराव औताडे (वय 55 वर्षे, पत्ता, खत्रीनगर हर्सूल, ता जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या मिनी स्कूल बस चालकाचे नाव आहे.

मृताचे भाऊ राजु उत्तमराव औताडे (वय 50 वर्षे, व्यवसाय चालक, पत्ता खत्रीनगर हर्सूल, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फुलंब्री पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, त्यांचा मोठा भाऊ विलास औताडे हा के. व्ही. एस इग्लिश स्कूल भगतसिंग नगर हर्सूल या शाळेचे विद्यार्थी स्वताःची छोटी स्कूल बस (एम.एच-20 डी डी-0394) ने विद्यार्थी सोडण्याचे काम करतात. दिनांक 20/09/2023 रोजी सकाळी सात वाजता विलास उत्तमराव औताडे हा त्यांच्या जवळील स्कूल बसने विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून शाळेमध्ये घेवून आले होते.

त्यानतंर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानतंर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राजु उत्तमराव औताडे गे वाळूज येथे कामानिम्मीत असताना लहान भाऊ संजय औताडे याने सांगितले की, भाऊ विलास औताडे हा त्याच्या जवळील मिनी स्कूल बसने साई कल्याणी सोसायटी सावंगी येथे विद्यार्थी सोडून परत येत असताना केब्रिज ते सावंगी बायपास रोडने सावंगीकडे येणार्या एका स्विफ्ट कार (क्र एम.एच-04-डी.जी-3000) च्या चालकाने भाऊ विलास औताडे यांच्या मिनी स्कूल बसला धडक दिली. दिनांक 20/09/2023 रोजी दुपारी  साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या धडकेत विलास औताडे यांच्या डोक्यास, छातीला गंभीर मार लागला आहे. दुनाखे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे घेवून येत आहे असे त्याने सांगितले. त्यावरुन राजु उत्तमराव औताडे हे तात्काळ दुनाखे हॉस्पीटल सेशन कोर्ट समोर संभाजीनगर येथे पोहोचले. भाऊ विलास औताडे यास पाहिले असता त्याच्या डोक्यास गंभीर, छातीला जोराचा मार लागला होता. तेथील डॉक्टरांनी भाऊ विलास उत्तमराव औताडे हा मृत झाल्याचे सांगितले. नतंर भाऊ विलास उत्तमराव औताडे यांचा मृतदेह पी.एम साठी घाटीत पाठविण्यात आला होता.

मृतदेहाचा क्रांतीचौक पोलिसांनी पंचनामा केल्यानतंर दिनांक 21/09/2023 रोजी रोजी सकाळी घाटीत पी.एम झाले. त्यानंतर हर्सूल येथील स्मशानभूमीत रिवाजप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर मृताचे भाऊ राजु उत्तमराव औताडे यांनी अपघात स्थळी जावून पाहिले असता तेथे मिनी स्कुल बस पडलेली होती व अपघात करणारी स्विफ्ट कार पोलिसांनी फुलंब्री पोलीस स्टेशनला जमा केल्याचे समजले.

मृताचे भाऊ राजु उत्तमराव औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्विफ्ट कारचालकावर (क्र एम.एच-04-डी.जी-3000) फुलंब्री पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!