महाराष्ट्र
Trending

सचखंड एक्सप्रेस 7 मार्चला मार्ग बदलून धावणार, जाणून घ्या मार्ग !

नांदेड, दि. ३ – नांदेड येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस 07 मार्चला मार्ग बदलून धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

उत्तर मध्य रेल्वे, आग्रा विभागात नॉन-इंटरलॉक वर्किंग करण्यात येणार असल्यामुळे दिनांक 07 मार्च, 2023 ला हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 12715 हजूर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आग्रा केंट ते नवी दिल्ली दरम्यान मार्ग बदलून धावेल.

ही गाडी आग्रा, इत्मद्पूर, मितवाली, गाझियाबाद, नवी दिल्ली अशी मार्ग बदलून धावेल. नवी दिल्लीच्या पुढे अमृतसरपर्यंत ती नियोजित मार्गानेच धावेल

आज दिनांक 03 मार्चला नांदेड येथून सुटलेली गाडी 12715 हजूर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आग्रा ते नवी दिल्ली दरम्यान मार्ग बदलून न धावता नियोजित मार्गानेच धावेल.

Back to top button
error: Content is protected !!