महाराष्ट्र
Trending

वाळूमाफियांची जालना जिल्ह्यात दादागिरी, तहसीलदारांच्या गाडीपुढे स्कॉर्पिओ लावून दोन वाळूचे टिप्पर पळवून लावले, पहाटेचा थरार !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – जालना जिल्ह्यातील वाळूमाफियांची दादागिरी वाढत असून तहसीलदारांच्या गाडीलाही ते जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठा पहाटेच्या सुमारास गेलेल्या मंठ्याच्या तहसीलदारांना हा थरारक अनुभव आला. दोन टिप्परला त्यांनी थांबण्याचा इशारा दिला मात्र, त्या दोन्ही टिप्परचालकांनी गाड्या दामटल्या. त्या टिप्परचा पाठलाग करत असताना तहसीलदारांच्या गाडीसमोर एक स्कॉर्पिओने अडथळा निर्माण करून दोन्ही टिप्परला पळून जाण्यास मदत केली. जालना जिल्ह्यातील तळणी ते लोणार या मार्गावर पहाटे 5.25 वाजेदरम्यान ही घटना घडली.

तहसीलदार रुपा विठ्ठलराव चित्रक (तहसील कार्यालय मंठा ता. मंठा जि.जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 11/10/2023 रोजी तहसीलदार रुपा चित्रक या शासकीय वाहनाने पहाटे 5.25 वाजेदरम्यान अवैध गौण खणिज प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकामी तळणी ते लोणार हायवे वरील तळणी येथे गेल्या होत्या. सदर ठिकाणाहून अवैधरित्या दोन वाळुचे टिप्पर ज्यामध्ये प्रत्येकी अंदाजे दोन ब्रास (एकूण अंदाजे चार ब्रास वाळु) असल्याचे दिसून आले.

शासकीय वाहनाने सदरील दोन्ही टिप्परचा पाठलाग करून त्यांनी वाहन थांबवण्याचे सांगितले असता त्यांनी वाहन न थांबवता तळणी ते लोणारच्या दिशेने वेगाने साईड न देता पळवू लागले. त्यावेळी स्कॉर्पिओ वाहनाच्या मागच्या साईटला वेगाने आली. त्यांने तहसीलदार यांच्या शासकीय वाहनाच्या पुढे स्कॉर्पिओ वाहनाव्दारे अडथळा निर्माण करून गुंडप्रवृतीचा अवलंब केला.

त्या स्कॉर्पिओने विनानंबरचे दोन्ही टिप्पर लोणारच्या दिशेने पळवून लावून शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला. तसेच सदररील वाहनामधील असलेला वाळुची चोरी करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. सदरील दोन्ही वाहनाव्दारे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करून रुपये 328,000/- इतकी दंडात्मक रक्कम न भरण्याचे हेतूने वाहने पळून नेवून शासनाची आर्थिक नुकसान केले.

याप्रकरणी तहसीलदार रुपा विठ्ठलराव चित्रक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन टिप्परचे मालक व चालक, स्कॉर्पिओ पासींग नंबर MH21BW35 मालकावर मंठा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!