महाराष्ट्र
Trending

प्रेमसंबंधातून युवकाची जालन्याच्या मोतीबाग तलावात आत्महत्या ! माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा अन् फोन बंद केला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – प्रेमसंबधातून युवकाने जालन्याच्या मोतीबाग तलावात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. मुलीच्या वडिलाने धमकावल्याने तो अपमानित झाला. या त्रासाला कंटालून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फोन केला होता व म्हणाला होता की, माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा अन् फोन बंद केला.

कुणाल कांबळे असे मृत युवकाचे नाव आहे. मृताचा भाऊ अमोल किशोर कांबळे (वय 20 वर्षे व्यवसाय लॅब टेक्नीशियन तिरुपती पॅथॉलॉजी जालना रा. मंठा चौफुली जालना) याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, भाऊ कुणाल हा मानधना लॅब जालना या ठिकाणी काम करण्यास होता. कुणाल याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती कुणालच्या घरच्यांना नव्हती.

ते चोरून लपून ऐकमेकांना भेटत व बोलत होते. मागील दोन महिण्यांपूर्वी कुणाल व त्या मुलीला तिचे वडील यांनी सामान्य रुग्नालय जालना येथे एकत्र बोलतानी पाहिले होते. त्यांना थांबवून ठेवले होते. तेव्हा कुणाल याने नातेवाईकास तेथे बोलावून घेतले होते. तेव्हा कुणालच्या नातेवाईकासमोर मुलीच्या वडिलाने कुणाल याला मारहाण केली होती परंतु कुणाल व त्याच्या नातेवाईकाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती.

दि. 10/10/2023 रोजी सध्याकाळी 05.30 वाजेच्या दरम्यान कुणालच्या नातेवाईकाच्या घरी मुलीचे वडील व आई आले. ते तेथे गोंधळ घालू लागले. त्यावेळी कुणाल हा तेथेच होता. त्याला सुध्दा ते शिवीगाळ करून धमकावत होते. त्यानंतर कुणआल तेथून रागाने निघून गेला व थोडयावेळाने मुलीचे आई वडील सुध्दा तेथून निघून गेले होते. काही वेळाने कुणालच्या भावाला कुणालचा मित्राचा फोन आला व त्याने सांगितले की मला कुणालचा फोन आला व तो म्हणाला की माझी काही चुक झाली असेल तर मला माफ करा असे म्हणून फोन बंद केला.

त्यानंतर कुणालच्या भावाने कुणालला संपर्क केला असता तेव्हा सायंकाळी 06.37 वाजता संपर्क झाला असता तो म्हणाला की, मी मोतीबाग या ठिकाणी आहे व फोन बंद केला. नातेवाईक त्याला शोधण्यासाठी गेले असता मोतीबाग येथे तलावाच्या बाजुला कुणालचा मोबाईल व स्कुटी दिसून आली. नातेवाईकांनी तातडीने फायर ब्रिग्रेड दल व पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या मदतीने शोध घेतला असता कुणालचा मृतदेह मोतीबाग तलावात मिळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यास सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतू डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी मृताचा भाऊ अमोल किशोर कांबळे (वय 20 वर्षे व्यवसाय लॅब टेक्नीशियन तिरुपती पॅथॉलॉजी जालना रा. मंठा चौफुली जालना) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या आई वडिलावर चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!