छत्रपती संभाजीनगर

मैत्रिणीला बोलल्यावरून तिघांची युवकास मारहाण, डोक्यात काचेची वस्तू मारल्याने युवक जखमी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – मैत्रीनी सोबत बोलतो या कारणावरून तिघांनी युवकाला मारहाण केल्याची घटना बाबा पेट्रोलपंपाजवळ रात्रीच्या सुमारास घडली. यात युवक जखमी झाला. त्याच्या डोक्यात काचेची वस्तू मारल्याने रक्त निघाल्याचे पाहून मारेकरी तिघे पळून गेल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद केले आहे.

अभय गणेश शिंगारे (वय 22 वर्षे, रा. नागेश्वरवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. अभय शिंगारे याने पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 10/10/2023 रोजी रात्री 10.00 ते 10.30 वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोलपंप येथे अभय शिंगारे व  मित्र गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते.

तेथे अभय शिंगारे याच्या ओळखीचा मित्र चेतन उत्तम ठाकुर (वय 22 वर्षे रा. भोईवाडा) हा त्याच्या दोन मित्रासह आला व अभय व त्याच्या मित्राला म्हणाला की चहा घेवू असे म्हणुन बाबा पेट्रोलपंप जवळील हाजी टी हाऊस येथे ते गेले. तिथे चेतनचा मित्र अभयला म्हणाला की, इनके (चेतन आणी त्याची मैत्रीण या दोघाच्या ) “बीच मे मत आ” असे म्हणुल शिवीगाळ सुरु केली.

चेतन याने कोणत्यातरी काचेच्या वस्तूने अभयच्या डोक्यात मारले तसेच त्याच्या एका मित्राने सुध्दा हाताचापटाने मारले. अभयच्या डोक्यातुन रक्त निघाल्याचे पाहुन ते सर्व तेथून पळुन गेले. जखमी अभयला त्याच्या मित्राने घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला डाव्या कानाच्यावर टाके दिले.

याप्रकरणी जखमी युवक अभय गणेश शिंगारे याने दिलेल्या फिर्यादीवरून चेतन उत्तम ठाकुर (वय 22 वर्षे रा. भोईवाडा) व त्याच्या अन्य दोन मित्रांवर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना शेख करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!