सिल्लोड

श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थानचा कारभार सर्वानंद सरस्वती महाराजांकडे!

सिल्लोड, दि. १२ ः सिल्लोडच्या श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थानचा कारभार आता सर्वानंद सरस्वती महाराज पाहणार आहेत. ओमकारगिरी महाराजांना वयोमानानुसार संस्थानचा कारभार पाहणे शक्य होत नसल्याने सर्वांनी मिळून त्‍यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वानंद सरस्वती महाराजांची निवड केली. १० डिसेंबरला त्‍यांनी पदभार स्वीकारला.

उत्तराधिकारी निवडण्यासाठी बैठक झाली. या वेळी नाशिक येथील आनंद आखाड्यातील सर्व सदस्य, केळगावचे ग्रामस्थ, मुर्डेश्वर संस्थानचे विश्वस्त, पंच कमिटीची उपस्थिती होती. सर्वांनी मिळून संस्थानचे उत्तराधिकारी म्हणून सर्वानंद सरस्वती महाराजांकडे जबाबदारी सोपवली.

सरपंच लताबाई वाघमोडे, सोमनाथ कोल्हे, संतोष जाधव, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष सर्जेराव पवार, विकास मुळे, अंकुश कोठाळे, विश्वनाथ शिंदे, दुर्गादार जाधव, चनाअप्पा, हिंगमिरे, शिवशंकर ज्ञाने, दत्तू मुळे आदींची उपस्थिती होती.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

असे आहे मुर्डेश्वर संस्थान…
मराठवाडा-खानदेशच्या सीमेवर मुर्डेश्वर संस्थान आहे. प्रभू श्रीराम व सीता माता खानदेशाकडून येत असताना या ठिकाणी थांबल्याची आख्यायिका आहे. सीतामातेने या ठिकाणी शिवपूजा केली. शिवलिंग स्थापन करून मागे खानदेशकडे मुरडून पाहिले म्हणून या क्षेत्रास मुर्डेश्वर नाव पडले. तपोवन नाशिक व अजिंठा पर्वत रांगेतील डोंगर दऱ्या, झाडे वन्य प्राण्यांमुळे हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.

मंदिराच्या दक्षिणेस दीड किलोमीटरवर केळगाव आहे. मुर्डेश्वराचे मंदिर ऐन पहाडाच्या टोकावर उभारलेले असून, मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालता येत नाही. मंदिर परिसरात बजंरग बली, शनिदेव, गणपती, सीतामाईचे मंदिर आहे.

Back to top button
error: Content is protected !!