खुलताबादगंगापूरसोयगाव

ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढवत असलेल्या महिलेच्या पतीची आत्‍महत्‍या!, गंगापूरमध्ये खळबळ

औरंगाबाद, दि. १२ ः ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या महिलेच्या पतीने घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्‍यात समोर आली आहे. याशिवाय एका उच्‍चशिक्षित तरुणानेही विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याचे खुलताबादमध्ये समोर आले. या आत्‍महत्‍यांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे.

वेरूळ का आला असेल?
बी. फार्मसी झालेल्या युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्याची दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्‍यातील वेरूळ येथील तेलबन तलावाजवळ काल, ११ डिसेंबरला सकाळी समोर आली. पंकज सुरेश येवले (३२, रा. गोंदेगाव, ता. सोयगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. वेरूळ येथील गट क्र. ५९ मधील विहिरीत मृतदेह दिसून आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस पाटील रमेश ढिवरे यांना कळवले.

त्‍यांनी खुलताबाद पोलिसांना कळवले. पोलीस अंमलदार सुदाम साबळे यांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटली. तो सोयगाव तालुक्‍यातील असल्याचे समोर आले. त्‍याने आत्‍महत्‍या का केली, आत्‍महत्‍या करण्यासाठी वेरूळला का आला, याची माहिती घेत आहेत.

बबन रात्री झोपला अन्‌ सकाळी…
राहत्‍या घरात ४० वर्षीय व्यक्‍तीने आत्‍महत्‍या केल्याची घटना गंगापूर तालुक्‍यातील झांजर्डी येथे काल, ११ डिसेंबरला सकाळी समोर आली. बबन होनाजी रोडगे असे आत्‍महत्‍या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. शनिवारी रात्री जेवण करून तो झोपी गेला होता. रविवारी सकाळी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसून आला. कुटुंबियांनी टाहो फोडताच शेजारी जमा झाले.

रुग्णवाहिकेतून मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. बबनच्या आत्‍महत्‍येचे कारण समोर आलेले नाही. त्‍याची पत्‍नी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठी उमेदवार आहे. असे असताना बबनने आत्‍महत्‍या केल्याने खळबळ उडाली आहे. बबनच्या पश्चात आई, पत्‍नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!