सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा या पर्वाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत असून, त्यांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यामागे आश्चर्यवर्धक घडामोडी आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच हे पहायला मिळत आहे.
गेल्या आठवड्यात समृद्धी जाधव, तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक घराबाहेर पडले होते. नंतर वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ हेस्पर्धकदेखील बाहेर पडले. नंतर डॉ. रोहित शिंदेचा नंबर लागला. या आठवड्यात स्नेहलता वसईकर हिला घराबाहेर पडावे लागले आहे. चार सदस्य नॉमिनेटेड झाले होते.
यात अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, स्नेहलता वसईकर, प्रसाद जवाडे यांचा समावेश होता. पण स्नेहलताचा नंबर लागला. नव्या भागात प्रसादबद्दल नाराजी व्यक्त होत होती. पण त्यांचं घरातलं स्थान कायम राहिलं. स्नेहलता बाहेर पडणार हे स्पष्ट झालं तेव्हा ती चांगलीच भावूक झाली. घरातील इतर स्पर्धकांनाही हा मोठाचा धक्का होता. त्यामुळे तेही भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
घराबाहेर पडताना स्नेहलता म्हणाली, की कुणाला मी नकळत दुखावलं असेल तर माफी मागते. मला खोटं नाही वागता येत, असे ती म्हणाली. आता स्नेहलतानंतर कुणाचा नंबर लागणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढच्या आठवड्यात कोण राहील, कोण जाईल, कोण कॅप्टन होईल अन् कोण नॉमिनेट होईल, हे ठरणार आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe