छत्रपती संभाजीनगर शहरातील हे रस्ते आजपासून दहा दिवस राहणार बंद ! नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक शाखेने सूचवले हे पर्यायी मार्ग !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १५- आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून छत्रपती संभाजीनगर शहरातील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. यामुळे भाविकांची आणि वाहनधारकांची गैरसोय होवू नये म्हणून कर्णपुरा परीसरातील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद केले असून त्यासाठी पर्यायी मार्ग वाहतूक शाखेने सूचवले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहनधारकांनी खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी केले आहे.
दिनांक 15/10/2023 रोजी पासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. कर्णपुरा येथे श्री. तुळजाभवानी देवीचे मंदिर असून नवरात्रोत्सव दरम्यान देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पहाटे पासून छत्रपती संभाजीनगर व आजू बाजुच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. कर्णपुरा मैदानात नवरात्रातील नऊ दिवस यात्रा भरते. नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांत प्रामुख्याने महिला, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ति सहभागी होत असतात.
यात्रा व देवीच्या दर्शनासाठी भाविक पायी व आप आपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येतात. तसेच विजयादशमीच्या दिवशी कर्णपुरा येथील श्री. बालाजी भगवान यांची रथयात्रा मिरवणूक सालाबादा प्रमाणे निघत असते. त्यामुळे सदर परिसरात भाविक, नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव दरम्यान दिनांक 15/10/2023 रोजीचे 00.01 वाजे पासून ते 24/10/2023 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंद करण्यात आले आहे. वाहतूकीस बंद करण्यात येणारे मार्ग पुढील प्रमाणे-
1) लोखंडीपुल ते पंचवटी चौक जाणारा व येणारा मार्ग
2) कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे जाणारा व येणारा मार्ग
3) महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते पंचवटी चौक उड्डाण पुलाखालील जाणारा व येणारा मार्ग
4) रेल्वेस्टेशनकडून पंचवटी चौकाकडे पुला खालून जाणारा मार्ग
बंद मार्गासाठी पर्यायी मार्ग
1) रेल्वेस्टेशनकडून मध्यवर्ती बसस्थानक, छावणी, पडेगावकडे जाणारी सर्व वाहने ही महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) वरील उड्डाणपुलाचा वापर करतील.
2) नाशिक, धुळे कडून येणारी व जालना, बीडकडे जाणारी वाहने ही शरणापुर फाटा, साजापूर फाटा, ए.एस. क्लब लिंक रोड-महानुभव आश्रम चौक, बीड बायपास या मार्गाने जातील व येतील.
3) नाशिक, धुळे कडून येणारी व पैठणकडे जाणारी वाहने ही शरणापूर फाटा, साजापूर फाटा, ए. एस. क्लब, लिंक रोड या मार्गाने किंवा नविन धुळे सोलापुर हायवेने जातील.
4) पुणे-अहमदनगरकडून येणारी व जालना, बीडकडे जाणारी वाहने ही ए. एस. क्लब, लिंक रोड, महानुभव आश्रम चौक, बीड बायपास रोडने जातील.
5) जालना बीड कडून येणारी व नगर – धुळे-नाशिककडे जाणारी वाहने ही कॅब्रीज नाका, झाल्टा फाटा, बीड बायपास रोड, महानुभव आश्रम, लिंक रोड, ए. एस. क्लब मार्गे जातील.
6) कोकणवाडी चौकाकडून पंचवटी चौकाकडे येणारी वाहने हि रेल्वेस्टेशन किंवा क्रांतीचौक मार्गे जातील.
सदर अधिसुचना ही पोलीस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. अधिसुचनाचा भंग करणारी व्यक्ती म.पो.कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक शाखा छावणीचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe