छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

औरंगाबाद शहरात महिलांसाठी विशेष बस सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद, औरंगपुरा ते चिकलठाणापर्यंत 5 फेऱ्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १: औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागातर्फे औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावर महिलांसाठी विशेष बस सेवेचे बुधवारी दिनांक 1 फेब्रुवारी, सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोवर उद्घाटन करण्यात आले.

विशेष म्हणजे या बस सेवेचे उद्घाटन औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या महिला अधिकारी प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, मीडिया विष्लेशक अर्पिता शरद, लेखापाल भाग्यश्री जाधव व अन्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनिकर, सहायक व्यवस्थपक (लेखा विभाग) माणिक निला व अन्य कर्मचारी अधिकारीही उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी बस विभागाने पहिल्यादांच फक्त महिलांकरिता विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी औरंगपुरा ते चिकलठाणा या मार्गावर महिला प्रवाश्यांकरिता विशेष बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

ही बस सकाळी 9.30 वाजेपासून ते 6.30 वाजेपर्यंत या मार्गावर  उपलब्ध राहील. दररोज औरंगपुरा ते चिकलठाणापर्यंत तर चिकलठाणा ते औरंगपुरा 5-5 फेऱ्या असणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात फेब्रुवारी महिन्यात जी 20 अंतर्गत विमेन 20 च्या महत्त्वाच्या बैठका होणार आहे. या बैठकांमध्ये महिलांच्या नेतृत्वात विकास कसं घडवू शकतो यासाठी धोरणात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर एक सांकेतिक पाऊल म्हणून या बस सेवेची सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती स्मार्ट शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनिकर यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!