महाराष्ट्रवैजापूर
Trending

अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बंदचा एल्गार, शिक्षक भारतीचे पदाधीकारी मात्र कामकाज सुरु ठेवणार !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४-  विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व कर्मचार्यांनी आज, ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. शिक्षक भारती मात्र या बंदमध्ये सामिल नसून या संघटनेचे पदाधीकारी नेहमीप्रमाणे अंगणवाडीमध्ये कामकाज सुरु ठेवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ मंत्री अदिती तटकरे यांना भेटले होते. तटकरे यांनी प्रलंबित मागण्यांवर सकारात्मकता दाखवून प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यामुळे शिक्षक भारतीने या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन त्यांनी दिले आहे. दरम्यान, शिक्षक भारतीने बंदमधून माघार घेतली असली तरी अन्य संघटना मात्र बंदवर ठाम आहेत.

महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारती शाखा छत्रपती संभाजीनगरचे पदाधिकारी व आ. कपिल पाटील यांची दि, २८ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच महिला विकास आयुक्त यांच्या समवेत बैठक पार पडली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने या मागण्यांचा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

यामुळे इतर संघटनांनाच्या संप व बंदमध्ये महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारती शाखा अंतर्गत वैजापूर तालुक्यातील बोरसर, लाडगाव, महालगाव गाढे पिंपळगाव बीट सहभागी होणार नाही, असे निवेदन संघटनेच्या जिल्हाअध्यक्षा माया म्हस्के, तालुका अध्यक्ष पुष्पा जाधव, सचिव कमल येवले, संघटक अश्विनी सोनवणे, आशा हरदे, गीतांजली लोहाडे यांनी दिले. हे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना आज, सोमवार ४ डिसेंबर रोजी दिले.

पूर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारती संपात सहभागी होणार नसून अंगणवाडी सुरू ठेवून संपूर्ण कामकाज सुरू ठेवणार असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैजापूर यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!