छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

अंबिकानगर भगतसिंगनगर लगतच्या आठ रस्त्यांवरील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! रस्त्यावरील 40 भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत आज अंबिकानगर भगतसिंगनगर लगत असलेल्या एकूण आठ रस्त्यात बाधित मालमत्ता धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. याशिवाय एकूण 40 भाजी विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत सदर भागात 15 मीटर विकास योजना रस्ता आणि पुढे 24 मीटर विकास योजना रसत्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. १५ मीटर विकास योजना रस्ता अंतर्गत सध्या काम अत्यंत जलद गतीने सुरू आहे. त्यातच काही नागरिकांनी मध्येच रस्त्यावर घरासमोरील पत्र्याचे शेड टाकून त्यावर व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल वापर सुरू केला होता. यामध्ये गाड्या धुण्याची वॉशिंग सेंटर, गॅरेज, सौंदर्यप्रसाधनाचे दुकाने, ब्युटी पार्लर या प्रकारचे अतिक्रमण होते.

याबाबत या नागरिकांना मागच्या बुधवार गुरुवारी सूचना देण्यात आली होती. तरी देखील या लोकांनी प्रशासनास सहकार्य न केल्याने आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या परवानगीने सदर शेडधारकांविरुद्ध कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. पुढे एका शाळेच्या शिक्षकाने त्याच्या रस्त्यावर येत असलेल्या तीन लोखंडी पायऱ्या स्वतः काढून घेण्याबाबत कारवाई सुरू केली तसेच पुढे संस्कार विद्यालय व इतर दोन शाळा धारकांनी महापालिकेत सहकार्य करून एका दिवसाची वेळ मागून घेतली आहे.

आता या रस्त्यावर 15 मीटर विकास योजनेअंतर्गत प्रथम रस्ता नंतर फुटपाथ व ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. याबाबत नागरिकांनीही सहकार्य केले आणि मनपा प्रशासनास अभिनंदन केले आहे. यानंतर या पथकाने आज सकाळी प्रथम सहकार नगर चौक ते पुढे शहानुर मिया दर्गा चौक पर्यंत उजव्या व डाव्या बाजूला बसलेले भाजी विक्रेते यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या भाजी विक्रेत्यांनी चक्क फुटपाथवर दुकाने मांडून रस्त्यावर हातगाड्या लावल्या होत्या. यामुळे सिग्मा हॉस्पिटल वरद हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर सकाळी आठ ते अकरा इतकी गर्दी होत होती की नागरिकांना पायी चालले किंवा जाणे येणे मुश्किल झाले होते. याबाबत दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठा अपघात झाला याबाबत माजी नगरसेवक निळकंठ यांनी आयुक्तांना त्याच वेळेस कळविले असता आज सकाळी माननीय अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी व उपायुक्त मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

एकूण 40 भाजी विक्रेत्याविरुद्ध मनपा प्रशासनाने आज कारवाई केली. त्यांच्या हातगाड्या, काटे वजन मापे व इत्यादी साहित्य जप्त केले. सदर रस्त्यावर सतत रोज सकाळी आठ ते 11 या वेळेस कारवाई होणार आहे असे अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग सौरभ जोशी यांनी सांगितले आहे.

ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपयुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद व मजूर पथक यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!