अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा दिलासादायक निर्णय घेऊ, लवकरच बैठक घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश !!
अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय
मुंबई, दि. ५ :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदतनीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.

खालील संबंधीत बातम्याही वाचा-
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला !
आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !
आशा व अंगणवाडी सेविकांच्या मार्फत मोबाईलद्वारे गावोगावी ऑनलाईन कार्यक्रम राबवण्याचे निर्देश !
One Comment