छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: शिऊर बंगला, कुंभार पिंपळगांव, नाथापूर, वासनवाडी, नांदुरघाट, आनंदगांवसह आठ महाविद्यालयांना शासनाची मंजुरी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात राज्य शासनाने आगामी वर्षासाठीच्या बृहत आराखड्यात केवळ आठ महाविद्यालयांनाच मंजुरी दिली आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

या संदर्भात उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांनी विद्यापीठास ७ जानेवारी रोजी पत्र पाठविले आहे. राज्य शासनाच्या उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक पार पडल्यानंतर विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांची स्थळबिंदू निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात केवळ आठ महाविद्यालयांचे स्थळ बिंदु निश्चित करण्यात आले आहेत.

सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षीसाठीच्या बृहत आराखड्यात चार जिल्ह्यांतून पुढील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्हा – गेवराई, शिऊर (बंगला ), जालना जिल्हा – कुंभार पिंपळगांव, बीड जिल्हा –  नाथापूर, वासनवाडी, नांदुरघाट,  आनंदगांव (दोन महाविद्यालये), उस्मानाबाद जिल्हा -शून्य.

यामध्ये दोन महाविद्यालये परांपरागत अभ्यासक्रमाची असून अन्य सहा व्यावसायिक अभ्यासक्रमाची आहेत. या संदर्भात राज्य शासनाने काल सायंकाळी बृहत आराखडा (Perspective Plan) जाहीर केल्यानंतर विद्यापीठात  कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक झाली.

येत्या १५ जानेवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेत राज्य शासनाच्या उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक पार पडल्यानंतर विद्यापीठांस्थळावर उपलब्ध आहे.

पायाभूत, भौतिक सुविधांबाबत विद्यापीठ दक्ष : कुलगुरु

राज्य शासनाच्या उच्च शिक्षण व विकास आयोगाने (माहेड) विद्यापीठ कार्यक्षेत्रात यंदा केवळ ८ महाविद्यालयांना मान्यता दिली. विशेषतः यामध्ये केवळ दोन महाविद्यालये परांपरागत अभ्यासक्रमाची असून अन्य सहा व्यावसायिक अभ्यासक्रमाची आहेत. राज्यशासनाच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठ प्रशासन प्रक्रिया राबवेल. तथापि आजपर्यंत संलग्नित असलेल्या सर्वच ४८६ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत, भौतिक सुविधांविषयी विद्यापीठ प्रशासन जागरुक राहिल, अशी प्रतिक्रिया मा. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!