छत्रपती संभाजीनगर
Trending

तळेसमान (आसेगांव) शिवारातून ट्रॅक्टर चोरणारा पडेगावचा आरोपी अटकेत ! दौलताबाद पोलिसांनी ४८ तासांत मुसक्या आवळल्या !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- दौलताबाद पोलिसांनी ट्रक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणला. चोरी गेलेला ४,५०,०००/- रुपये किंमतीचा ट्रक्टर जप्त करून पोलिसांनी पडेगावच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सचीन अंकुश वानखेडे (वय २५ वर्षे रा. माजी सैनिक कॉलनी पडेगाव छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व्हि. एम. सलगरकर यांनी दिलेली माहिती अशी की, तळेसमान (आसेगांव) शिवार गट नंबर ४८ येथील मोफीन खान उर्फ गुड्डु मकबुल पठाण यांचे शेतावर ट्रक्टर मालक वशिम आयुब बेग यांचे मामे भाऊ आनेद हमीद शेख यांनी त्यांचा NEW HOLLAND कंपनीचा ट्रक्टर क्र. MH-२०GK-६६७४ हा दि. १३/०९/२०२३ रोजी रात्री ०९.०० वाजता उभा करून ठेवला होता. दि.१४/०९/२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता परत येवून पाहिले असता ट्रक्टर अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस स्टेशन दौलताबाद येथे गुन्हा दाखल आहे.

हा गुन्हा दाखल होताच दौलताबाद पोलिसांनी तात्काळ अत्यंत बारकाईने व तंत्रशुध्द पध्दतीने तपास करून आरोपींचा शोध घेतला असता सदर गुन्हा हा सचीन अंकुश वानखेडे (वय २५ वर्षे रा. माजी सैनिक कॉलनी पडेगाव छत्रपती संभाजीनगर) याने केल्याची माहिती मिळाली. त्यास तात्काळ ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास दि. १९/०९/२०२३ रोजी अटक करून त्यांच्याकडुन चोरीस गेलेला ४,५०,००० रु. किं.चा ट्रक्टर जप्त करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ- १ नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग अशोक थोरात, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक आयुब पठाण, सफौ.शेख सलीम, पोना संजय दांडगे, यांनी पार पाडली. या गुन्हयाचा पुढील तपास स.फौ. शेख सलीम करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!