महाराष्ट्र
Trending

बदनापूर तालुक्यातील रोषणगावच्या उपसरपंचास मारहाण ! पोळ्याला बैल एकत्र जमण्यास विरोध केल्याने पाच जणांनी हल्ला चढवला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- लम्पी रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून पोळ्याला बैल एकत्र जमण्यास विरोध केल्याने पाच जणांनी बदनापूर तालुक्यातील रोषणगावच्या उपसरपंचावर हल्ला चढवला. यात उपसरपंच जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पाच जणांवर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

1) संभाजी मधुकर पवार (देशमुख) 2) भगवान भाऊसाहेब पवार (देशमुख) 3) बंडु लक्ष्मण पवार (देशमुख) 4) बबन श्रीमंत पवार (देशमुख) 5 ) मार्तंड पवार (देशमुख) अशी आरोपींची नावे आहेत. कृष्णा एकनाथ खरात (वय 33 वर्षे व्यावसाय शेती रा. रोषणगाव ता. बदनापूर जि.जालना) असे जखमी उपसरपंचाचे नाव आहे.

उपसरपंच कृष्णा खरात यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 14.09.2023 रोजी संध्याकाळी रोषनगाव येथे पोळ्याचा सण होता. जनावरांना लम्पी आजार पसरवू नये म्हणून प्रत्येक बैल मालक यांना अंतरांने बैल ठेवा असे उपसरपंच कृष्णा खरात सांगत होते. त्यावेळी गावातील प्रतिष्ठीत लोकही हजर होते.

साडेचार वाजेच्या दरम्यान गावातील 1) संभाजी मधुकर पवार (देशमुख) 2) भगवान भाऊसाहेब पवार (देशमुख) 3) बंडु लक्ष्मण पवार (देशमुख) 4) बबन श्रीमंत पवार (देशमुख) 5 ) मार्तंड पवार (देशमुख) हे उपसरपंच कृष्णा खरात यांना म्हणाले की, तुम्ही बैल का आडविता ? त्यावरुन त्यांना उपसरपंच कृष्णा खरात म्हणाले की, लम्पी आजार वाढवू शकतो. त्यावरुन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून संभाजी यांनी लोखंडी सळई डोक्यात मारून डोके फोडले.

उपसरपंच कृष्णा खरात यांच्या डोक्यातून रक्त निघुन गंभीर दुखापत झाली.  तसेच भगवान, बंडु, बबन, मार्तंड यांनी उजव्या हाताच्या दंडावर व पाठीवर मारहाण केली. लोखंडी सळईने मारहाण केल्याने डोक्यात सात टाके पडले आहे. शिवीगाळ करून धमक्या दिल्या. मारहाण होत असतांना गावातील लोकांनी सोडवा – सोडव केली. जखमी उपसरपंच कृष्णा खरात यांनी सुरुवातीला ग्रामीण रुग्नालय बदनापूर व अधिक उपचारकामी सामान्य रुग्णालय जालना व तेथून छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार घेतला.

याप्रकरणी कृष्णा एकनाथ खरात (वय 33 वर्षे व्यावसाय शेती रा. रोषनगाव ता. बदनापूर जि.जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) संभाजी मधुकर पवार (देशमुख) 2) भगवान भाऊसाहेब पवार (देशमुख) 3) बंडु लक्ष्मण पवार (देशमुख) 4) बबन श्रीमंत पवार (देशमुख) 5 ) मार्तंड पवार (देशमुख) यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!