छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

महिला कर्मचाऱ्यास पाठीमागून मिठी मारली ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील संतापजनक प्रकार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – फोनवर बोलत असताना महिला कर्मचाऱ्यास पाठीमागून मिठी मारल्याचा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत घडला आहे. सदर महिला कर्मचाऱ्याने पोलिस ठाणे गाठून रितसर फिर्याद दाखल केली असून सिटी चौक पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हा संतापजनक प्रकार १४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान प्रकल्प विभाग महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे घडला. १) संदीप बोर्डे, २) अनुराग गाडगे अशी आरोपींची नावे आहेत.

यातील महिला फिर्यादी व आरोपी हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकाच विभागात काम करतात. ते एकमेकांना ओळखत असून फिर्यादीस फोन आल्याने फिर्यादी त्यांच्या रुमच्या बाहेर येवून फोनवर बोलत असतांना यातील आरोपी क्रं. 1 संदीप बोर्डे याने फिर्यादी महिलेस पाठीमागून मिठी मारली. फिर्यादीने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेतले असता तो फिर्यादी महिलेला धमकावले. त्यानंतर फिर्यादीस डोळा मारून फिर्यादी सोबत अश्लिल चाळे करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.

तसेच आरोपी क्रं.2 अनुराग गाडगे याने फिर्यादीस त्याचे रुममध्ये बोलावून घेवून फिर्यादीचा हात पकडून धमकावले व फिर्यादीस शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केल्याची तक्रार महिला फिर्यादीने दिली आहे.

या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये १) संदीप बोर्डे, २) अनुराग गाडगे यांच्यावर कलम 354,323, 504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोउपनि श्रीमती संगीता गिरी या करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!