छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता एस डी पानझडे प्रकरणी प्रधान सचिवांच्या मार्फत चौकशी

- उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. 28 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता एस डी पानझडे प्रकरणी प्रधान सचिवांच्या मार्फत चौकशी करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये स्थापत्य पदविका आधारे नोकरीवरून शासकीय नियमाचे उल्लंघन करत पदोन्नती मिळून शहर अभियंतापर्यंत पदोन्नती मिळवणे. पदवीधर अभियंताला डाउनलोड स्थापत्य पदविकाधारक असलेल्या सखाराम धोंडीबा पानझडे यांना पदोन्नती देणे, तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर गैरमार्गाने करार पद्धतीवर स्वतःची नेमणूक करून घेणे,

शासन निर्णय अंमलबजावणी करण्याऐवजी उल्लंघन करणे, याबाबत प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

मंत्री सामंत म्हणाले, या समितीवर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केली होती. यावेळी सदस्य हरिभाऊ बागडे, हसन मुश्रीफ यांनी सहभाग घेतला होता.

Back to top button
error: Content is protected !!