छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहराचा डीपी प्लॅन नकाशा दोन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश ! आरक्षण टाकताना प्रशासकांनी यावर लक्ष केंद्रित करण्याचे दिले आदेश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – शहराची विकास योजनेत आरक्षण टाकताना खेळाचे मैदान, उद्यान, पार्किंग, एसटीपी प्लांट, कचरा प्रोसेसिंग प्लांट, हॉकर्स झोन आणि रुंद रस्ते या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले.

आज दिनांक 03 जुलै रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासक जी श्रीकांत यांनी शहराच्या डीपी प्लॅनच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत प्रशासक जी श्रीकांत यांनी ईएलयु (एक्झिस्टिंग लँड युज) नकाशा बघितला आणि सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी भविष्यात शासकीय गृह प्रकल्पासाठी देखील जागा आरक्षित करण्याचे निर्देश दिले.

पीएलयु (प्रपोस्ड लँड युज) नकाशा बाबत प्रशासक जी श्रीकांत यांनी विचारणा केली असता रजा खान यांनी दोन महिन्यांत पीएलयु नकाशा सादर करण्यात येईल, असे सांगितले. सदरील बैठकीत शहर अभियंता ए बी देशमुख, उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, उपसंचालक विकास योजना रजा खान, उप अभियंता नगररचना संजय कोंबडे, अक्षय इंजिनियर्स एजन्सीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!