प्रेमसंबधांतून पळविलेल्या अल्पवयीन मुलीला नांदेडमधून घेतले ताब्यात ! वाळूज एमआयडीसीतून फूस लावून नेले होते पळवून !!
अनैतिक मानवी वाहतुक कक्षाच्या पथकाने आणले शोधून
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – फूस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीस नांदेडमधून ताब्यात घेण्यात आले आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातून तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रात पित्याने दिली होती. फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर तब्बल एक वर्षाने पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळाले.
पोलीस ठाणे एम.आय.डी.सी वाळूज येथे गुरनं १५३/२०२२, कलम ३६३ भादंवी नुसार दिनांक – २५/०२/२०२२ रोजी अल्पवयीन मुलीच्या बाबाने दिलेले तक्रारी वरून अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी यश ऊर्फ रोहित नारायण हाराडे (रा. एम.आय.डी. वाळूज जि. छत्रपती संभाजीनगर) याने फिर्यादी यांच्या मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेले बाबत तपासात माहीती मिळाली होती. सदर गुन्हयातील मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने दिनांक ०६/०७/२०२२ रोजी सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षात पुढील तपास कामी पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी वाळूज येथून वर्ग करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात अनैतिक मानवी वाहतुक कक्षाच्या पथकाने बारकाईने तपास करून सदर गुन्हयातील अल्पवयीन मुलगी व आरोपीचा नांदेड येथे जावून शोध घेतला. दोन दिवस नांदेड येथे थांबून सदर गुन्हयातील पीडित मुलगी हिस दिनांक १७.०३.२०२३ रोजी नांदेड मधून ताब्यात घेतले.
सदर गुन्हयात अनैतिक मानवी वाहतुकचा कोणताही प्रकार घडल्याचे दिसून येत नसल्याने अल्पवयीन मुलगी पोलीस ठाणे एम.आय.डी.सी वाळूज येथे हजर केले व सदर गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयात पुढील तपास पोलीस ठाणे एम.आय.डी.सी वाळुज करीत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, अपर्णा गिते पोलीस उपायुक्त (मुख्यालय), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे शिवाजी तावरे पोलीस निरीक्षक सुषमा पवार, सफौ इसाक पठाण, पो ह डी.डी खरे, संतोष त्रिभुवन, मपोअं हिरा चिंचोळकर तसेच सायबर सेल टीमचे संदीप पाटील, चालक पोलीस अंमलदार सोमनाथ दुकळे यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिलेली माहिती अशी की,
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe