लाईनमन दिवस: सकाळी आठ वाजता घराबाहेर पडलेला लाईनमन रात्री उशिरा पर्यंत कार्यरत असतो !
लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लाईनमन दिवस उत्सहात साजरा
- सुरक्षेला प्राधान्य देत ग्राहकाभिमूख सेवा द्या – मुख्य अभियंता अनिल डोये
नांदेड, दि. 4 मार्च : महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे. अशा वीज सेवेच्या क्षेत्रातील लाईनमन हा महावितरणचा चेहरा आहे. घरोघरी प्रकाश देणारा दुवा असल्याने लाईनमनने आपल्या सुरक्षेला प्राध्यान्य देत ग्राहकाभिमूख सेवा देण्याच काम करत कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी संपुर्ण कार्यक्षमतेने कार्यरत रहावे असे विचार व्यक्त करत मुख्य अभियंता अनिल डोये यांनी देशभर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या लाईनमन दिनाच्या सर्व लाईनमनला शुभेच्छा दिल्या. मला माहीत आहे, सकाळी आठ वाजता घराबाहेर पडलेला माझा लाईनमन रात्री उशिरा पर्यंत कार्यरत असतो, असेही ते म्हणाले.
लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्युत भवन येथे आज (दि. ४ मार्च ) लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, महेंद्र बागूल, राजेश आरेकर, सुदर्शन कालेवाड, ॲड शैलेंद्र पाटील, पंडित अंबेकर, प्रमोद क्षीरसागर, महेश गट्टूवार, महेश औरादे, पांडूरंग बोडके, महेश वाघमारे पाटील, स्नेहा हंचाटे, पिलंगवाड यांच्या प्रमूख उपस्थितीत २०० लाईनमनना पुष्पगुच्छ देवून व सुरक्षेची शपथ घेवून मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्य अभियंता अनिल डोये म्हणाले की, ग्राहकांसोबत थेट संबंध असलेला कर्मचारी म्हणजे लाईनमन आहे. त्यामुळे लाईनमनच्या वागणुकीवरच कंपनीची प्रतिमा ठरत असते. कोरोना काळात जीवावर उदार होत लाईनमननी दिलेली सेवा ही गौरवास्पद आहे. एकप्रकारे कोरोना यौध्दाचेच काम आपण केलेले आहे. नांदेड परिमंडळासारख्या क्षेत्रात काम करत असताना अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. अखंडित वीजपुरवठयासोबतच थकबाकी वसुली हे सुध्दा मोठे आव्हान आहे. मला माहीत आहे, सकाळी आठ वाजता घराबाहेर पडलेला माझा लाईनमन रात्री उशिरा पर्यंत कार्यरत असतो.
मागील काही काळात शंभर टक्कयांपेक्षा जास्त वीजबील वसुलीचे काम आपण केलेले आहे. पुढील काळातही हीच कार्यक्षमता अबाधीत ठेवत आपल्या परिमंडळाची वसुली क्षमता वाढवायची आहे. त्याद्ष्टीने नियोजनबध्द काम करत सांधिक कार्यालयाने दिलेले लक्ष्य साध्य करायचे आहे. असे सांगत मुख्य अभियंता अनिल डोये यांनी वीजयंत्रणेवर काम करत असताना सुरक्षा साधनांचा वापर करत वीजसेवा बजावावी असे आवाहन केले.
याप्रसंगी सुरवातीला उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगीरवार यांनी विद्युत सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मार्च अखेर सेवानिवृत्त होणारे लाईनमन श्याम कंठेवाड यांचा प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ नसिर शेख, माधुरी पटनुरकर आदी लाईनमननी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व उप अभियंता प्रमोद क्षीरसागर यांनी शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रमाचे सtत्रसंचलन व प्रास्ताविक प्रमोद देशमूख यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र बागूल यांनी केले. याप्रसंगी नांदेड शहर विभागातील असंख्य लाईन्मन व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe