छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

दहा नवीन प्रशासकीय झोनची हद्द दर्शवणारा नकाशा नागरिकांसाठी खुला ! कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता व नागरिकांची गैरसोय टळणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.२५ – नागरिकांना वार्डाच्या हद्दी स्पष्ट व्हाव्यात व कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता येण्यासाठी आस्तीत्वातील एकूण ०९ झोन कार्यालयाच्या हद्दी मध्ये बदल करून नवीन पुनर्रचनेनुसार महानगर पालिका प्रशासाकीय झोनची संख्या वाढवून एकूण १० प्रशासकीय झोन तयार करण्यात आलेले आहेत. झोन कार्यालयाची हद्दी दर्शविणारा नकाशा व हद्दीचे विवरण नगर रचना विभाग, तळमजला, टप्पा क्र. ०३ महानगर पालिका मुख्य इमारत येथे प्रसिद्ध केला असून नागरिकांना तो बघता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत सध्यस्थितीत एकूण ०९ झोन कार्यालय अस्तित्वात आहेत. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार झोन कार्यालयास जाण्यासाठीचे अंतर कमी करणे, प्रशासकीय झोनच्या हद्दी बदलामुळे बहुतांशवेळा कर आकारणी व कर वसुली संदर्भाने अभिलेखे हस्तांतरित करत असताना मालमत्तांच्या दुबार नोंदी होतात, नसता मालमत्ता मिसिंग होतात परिणामी महानगरपालिकेच्या महसूल वसुली वर परिणाम होतो.

यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार नागरिकांना वार्डाच्या हद्दी स्पष्ट व्हाव्यात व कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता येण्यासाठी आस्तीत्वातील एकूण ०९ झोन कार्यालयाच्या हद्दी मध्ये बदल करून नवीन पुनर्रचनेनुसार महानगर पालिका प्रशासाकीय झोन ची संख्या वाढवून एकूण १० प्रशासकीय झोन तयार करण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राचे GIS Mapping द्वारे मालमत्तांचे Gio Tagging केले आहे. या द्वारे शहरांतर्गत प्रत्येक मालमत्तांची केलेल्या नोंदी नुसार प्राप्त सूचना / तक्रारींचे / आक्षेप अर्ज विहित वेळेत निकाली काढणे शक्य होईल. सदर पुनर्रचना विकास कामे, कर आकारणी व कर वसुली व इतर प्रशासकीय कामांसाठी कायम स्वरूपी राहणार असल्याने रचना करतांना प्रामुख्याने नैसर्गिक नाला, नदी, मुख्यरस्ता गृहीत धरण्यात आले असून झोनचे कार्यक्षेत्रा नुसार बिल्डिंग फूटप्रिंट व क्षेत्रफळाचा देखील विचार करण्यात आला आहे .

प्रशासकीय झोन कार्यालयाची हद्दी दर्शविणारा नकाशा व हद्दीचे विवरण नगर रचना विभाग, तळमजला, टप्पा क्र. ०३ महानगर पालिका मुख्य इमारत येथे प्रसिद्ध केला आहे. या बाबत सूचना / हरकती असल्यास ०७ दिवसाच्या आत शहर अभियंता विभागाकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सूचना / हरकती बाबत प्रशासकीय स्तरावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे मा.शहर अभियंता विभाग यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!