कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी 15 दिवसांत जाहिरात काढणार ! कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी करणार !!
मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांचा तारांकित प्रश्न
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी 15 दिवसांत जाहिरात काढली जाईल तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी 15 दिवसांत संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (दि.23) विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त असलेल्या पदासंदर्भात आज आ.सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात कृषी सहाय्यकांची 2115 पदे रिक्त आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे मु‘य काम तसेच कृषी क्षेत्रातील 40 ते 50 योजनांचे उदिष्ट त्यांना दिलेले असते.
आज एकाएका कृषी सहाय्यकांकडे 10 ते 15 गावांचा कारभार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कृषी सहाय्यकांची रिक्त असलेले पदे त्वरीत भरावीत अशी आग‘ही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली. या चर्चेत आ.राम शिंदे यांनी सहभाग घेत कृषी सहाय्यक या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम करावे अशी मागणी केली.
सदरील प्रश्नाला उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भरती करण्यात आलेली नव्हती असे सांगत पेसा अंतर्गत राज्यपालांनी जे आदेश दिले आहेत तीतके सोडून उर्वरित कृषी सहाय्यकांची रिक्त पदे 15 दिवसात जाहिरात काढून भरण्यात येतील असे सभागृहात सांगितले. तसेच कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी 15 दिवसात आपल्यासह संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सभागृहास आश्वस्त केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe