राजकारण
Trending

भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा.. इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..! वाचा रोहित पवारांचे शब्दांचे फटकारे..!!

मुंबई, दि. ५ – महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून सोशल मीडियामधून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. प्रादेशिक पक्षातील उभी फूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकंदरीत राजकीय वातावरण ढवळून निघत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या राजकीय परिस्थितीवर शब्दांचे फटकारे ओढले आहे. वाचा रोहित पवार यांच्याच शब्दात…

आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!

तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?

भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?

निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?

शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?

त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात..

Back to top button
error: Content is protected !!