रिक्षा चालकाची दादागिरी, धडक देवून चाकूने केले सपासप वार ! धमकावले.. आज तुझा आखरी दिवस, कोणी वाचवणार नाही, मारुनच टाकतो ! तर रिक्षाचालकानेही दिली चाकू हल्ल्यात जखमी झाल्याची तक्रार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – रिक्षाचालकाने पाठीमागून धडक देवून धमकावले की, आज तुझा आखरी दिवस, तुला कोणी वाचवणार नाही, मारुनच टाकतो. यानंतर चाकूचे सपासप वार करून जखमी केली. दरम्यान, रिक्षाचालकानेही पोलिसांत तक्रार दिली असून दोघांनी एकमेकांविधात तक्रार दिली असून पोलिस या प्रकरणाची सत्यता तपासत आहेत. ही घटना रात्री २०.४५ वाजेच्या सुमारास ऋतुजा बिअरबारजवळ, पुंडलीकनगर छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
रिक्षा चालक अनिल सुधाकर पवार (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. शुभम गौतम मोरे (वय २३, रा. देवूळगाव कोळ दुसरबीड, ता. लोणार, जि. बुलढाणा. हल्ली मुक्काम पुंडलीकनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.
फिर्यादी शुभम गौतम मोरे हे कामावरून घरी येण्यासाठी निघाले असता यातील आरोपी रिक्षाचालक अनिल पवार यांनी पाठीमागून रिक्षाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे फिर्यादी शुभम मोरे व त्यांची पत्नी रोडवर खाली पडले. याचदरम्यान रिक्षामधून रिक्षा चालक अनिल सुधाकर पवार हा खाली उतरून फिर्यादी शुभम मोरे यांच्याकडे आला.
त्याच्या उजव्या हातामध्ये धारदार चाकू होता. आरोपी रिक्षचालक अनिल पवार हा फिर्यादी शुभम मोरे यांना म्हणाला की. “आज तुझा आखरी दिवस आहे. आज तुला कोणी वाचवणार नाही तुला जिवंत मारुनच टाकतो” असे धमकावून त्याच्या हातातील धारदार चाकूने फिर्यादी शुभम मोरे यांच्या डाव्या छातीवर व पोटावर सपासप वार केले आणि परत तुला जिवंत मारून टाकतो परत असे धमकावून डाव्या बगलाजवळ व पाठीमागून कमरेवर परत दोन वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, रिक्षाचालक अनिल पवार (वय ३२, रा. मुकूंदनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुंडलीकनगर रोडने जात असताना आरोपी शुभम मोरे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकूने मारून जखमी केले. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीवरून पुंडलीकनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पउपनि काळे करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe