छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी: सर्व पोलिस स्टेशनसह वरिष्ठ पोलिसांचे कायम स्वरुपी मोबाईल नंबर ठेवा सेव्ह ! अडचणीच्या काळात मदतीसाठी तातडीने धावून येतील पोलिस !!

One Unit One Officer One Mobile Number Chhatrapati Sambhajinagar City Police

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – छत्रपती संभाजीनगरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सर्व पोलिस स्टेशनसह वरिष्ठ पोलिसांचे कायम स्वरुपी मोबाईल नंबर पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहेत. हे सर्व मोबाईल नंबर सर्व सामान्य जनतेने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवून अडचणीच्या काळात या मोबाईल नंबरवर कॉल केल्यास पोलिस मदतीसाठी शक्तीमान सारखे धावून येतील. ही भन्नाट कल्पना पोलिस आयुक्त मनोज लोहीया यांची असून याची अंमलबजावणी १ जून पासून करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त मनोज लोहीया यांनी शहरवासीयां करीता अभिनव योजना राबवण्यात येणार. “One Unit, One Officer, One Mobile Number” पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पो.ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांचे कायमस्वरुपी मोबाईल नंबरसर्व सामान्य जनते करीता उपलब्ध करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेने शहरातील सामान्य जनता व पोलीस अधिकारी यांच्यात सुसंवाद तयार व्हावा, संकट समयी संपर्क व्हावा, सामाजिक सलोखा आबाधीत ठेवण्याकरीता, “दक्ष नागरीक सुरक्षीत परिसर ” या मोहीम अंतर्गत वरिष्ठ अधिकारी ते सर्व पोलीस अधिकारी यांचेशी सातत्यपूर्वक संपर्क असावा. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांना तात्काळ माहिती कळविणेकरीता अवधी लागतो. सर्व सामान्य जनतेने पोलीस अधिकारी यांचे मोबाईल नंबर वर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही किंवा ते मोबाईल वर प्रतिसाद देत नाही. पोलीस स्टेशन किंवा शाखेतील पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन बदलून आलेल्या पोलीस अधिकारी यांना त्या विभाग किंवा परीसरातील लोकप्रतीनिधी, सामान्य जनता, गुप्त बातमीदार, पोलीस मित्र यांच्याशी संपर्क होण्या करिता अडथळा निर्माण होतो. नवीन अधिकारी यांचा जनतेशी संपर्क होईपर्यंत “Golden Hours / Golden Minutes” गमावून जातो. त्यामुळे ” पोलीस अधिकारी व जनतेतील ” सुसंवादात होणारा हा महत्वाचा अडथळा दुर करणेकरीता पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची” One Unit, One Officer, One Mobile Number”ही संकल्पना येत्या 01 जुन 2023 पासून छत्रपती संभाजीनगर शहरात राबवण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन व शाखेचे प्रभारी अधिकारी यांचेकरीता खालील मोबाईल नंबर हे कायम स्वरुपी उपलब्ध असल्याने नव्याने रुजू होणारे अधिकारी यांचेशी जनतेला तात्काळ संपर्क करणे सोईचे होईल. पोलीस ठाणे, सर्व शाखा व सामान्य जनता यांच्यात शासकीय कामकाज करतांना समन्वय राखून कामकाजात सुसूत्रता येईल.

पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यास त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी पदभार सोडतांना, पदभार स्वीकारणारे अधिकारी यांना देणे बंधनकारक राहणार असून शासकीय अभिलेखी त्याची नोंद असणारआहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आदेशीत केले असून सदरचे मोबाईल नंबर सर्व पो.स्टे. व शाखा येथील शहरवासीयांना माहिती व्हावेत याकरीता नोटीस बोर्ड वर लावण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील वरीष्ठ अधिकारी यांचे मोबाईल क्रमांक दि. 01 जुन 2023 रोजी पासून शहरवासीयांकरीता उपलब्ध होणार आहेत.

पोलीस आयुक्त – 9226514001
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) – 9226514002
पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 01 )- 9226514003
पोलीस उप आयुक्त (परिमंडळ (02)- 9226514004
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा – 9226514005
सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन- 9226514006
सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा- 9226514007
सहायक पोलीस आयुक्त, शहर विभाग- 9226514008

सहायक पोलीस आयुक्त, छावणी विभाग- 9226514009
सहायक पोलीस आयुक्त, सिडको विभाग- 9226514010
सहायक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग- 9226514011
सहायक पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा- 9226514012
पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष- 9226514013
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा- 9226514014
पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-  9226514015

पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा- 9226514016
पोलीस निरीक्षक पो.स्टे. सायबर- 9226514017
पोलीस निरीक्षक, सुरक्षा विभाग- 9226514018
पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोधक व नाशक पथक-  9226514019
पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग- 9226514020
पोलीस निरीक्षक, हायकोर्ट सुरक्षा- 9226514021
पोलीस निरीक्षक, वाचक शाखा- 9226514022

पोलीस निरीक्षक, भरोसा सेल (महिला सहाय्यता कक्ष)- 9226514023
पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सिटी चौक- 9226514024
पोलीस निरीक्षक, पो.स्टे. क्रांतीचौक- 9226514025
पोलीस निरीक्षक पो.स्टे. छावणी- 9226514026
पोलीस निरीक्षक पो.स्टे. वाळुज- 9226514027
पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम वाळुज- 9226514028
पोलीस निरीक्षक पो.स्टे. बेगमपुरा- 9226514029
पोलीस निरीक्षक पो.स्टे. दौलताबाद- 9226514030

पोलीस निरीक्षक पो.स्टे. वेदांतनगर- 9226514031
पोलीस निरीक्षक पो.स्टे. सिडको- 9226514032
पोलीस निरीक्षक पो.स्टे. जिन्सी-  9226514033
पोलीस निरीक्षक पो.स्टे. जवाहरनगर- 9226514034
पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम सिडको- 9226514035
पोलीस निरीक्षक पो.स्टे. मुकुंदवाडी- 9226514036
पोलीस निरीक्षक पो.स्टे. उस्मानपुरा- 9226514037
पोलीस निरीक्षक पो.स्टे. सातारा- 9226514038

पोलीस निरीक्षक पो.स्टे. हर्सूल- 9226514039
पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुंडलीकनगर- 9226514040
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, शहर विभाग ।- 9226514041
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, शहर विभाग 2- 9226514042
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, सिडको विभाग- 9226514043
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, छावणी विभाग- 9226514044
पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, वाळूज विभाग- 9226514045
पोलीस निरीक्षक, दंगा काबू पथक- 9226514046

कोर्ट मॉनटरींग सेल (पैरवी अधिकारी)- 9226514047
पोलीस निरीक्षक, मनपा अतिक्रमण हटाव पथक- 9226514048
पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग- 9226514049
पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग- 9226514050

जनतेने वरील मोबाईल नंबर हे आपले फोनबुक मध्ये संग्रहित करावेत, तसेच वेळप्रसंगी पोलीसांना आपली अडीअडचणीकळविण्यासाठी व मदत मिळविण्यासाठी, गोपनीय माहिती देण्यासाठीडायल 112 किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथील लॅन्डलाईन क्रमांक 2240500 हे क्रमांक सुध्दा उपलब्ध आहेत.

Back to top button
error: Content is protected !!