नौकरीच्या प्रतीक्षेतील युवतीला मंत्री दीपक केसरकरांनी दिले शिस्तीचे धडे ! तुम्हाला अजिबात कळत नाही, शिक्षक तुम्ही होऊ शकता का?
शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजे, माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही: मंत्री दीपक केसरकर
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – नौकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवतीने एका कार्यक्रमाच्या मंचावर असलेल्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. कार्यक्रम सुरु असतानाच या युवतीने भेट घेतल्याने दीपक केसरकर काहीसे नाराज झाले व त्यांनी त्या युवतीला शिस्तीचा धडाच शिकवला. साईटवर रजिस्ट्रेशन झाले पण पुढची प्रोसेस कधी होणार असा सवाल उपस्थित करणार्या त्या युवतीला केसरकर म्हणाले की, मागील पाच वर्षांत कोणी शिक्षक भरती केली का ? मी केली ना. मी ३० हजार नौकर्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पण उद्या जर मुलांना तुम्ही ही बेशिस्त शिकवणार असाल ते मला अजिबात मान्य नाही. शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजे, माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही, अशा कडक शब्दात दीपक केसरकर यांनी सदर नौकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवतीला सुनावलं.
त्या युवतीला दीपक केसरकर म्हणाले की, तुम्हाला अजिबात कळत नाही. शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे. यावर ती युवती म्हणाली की, साईट ओपन आहे. रजिस्ट्रेशन आहे पण प्रोसेसर पुढे चालतच नाही सर. यावर मंत्री केसरकर म्हणाले, प्रोसेसर चालत नाही तर तुम्ही गेलं पाहिजे. तुमचा चॉईस दिला पाहिजे. यावर ती युवती म्हणाली की, जाहिरातच आली नाही ना सर अजून. यावर मंत्री केसरकर म्हणाले, आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे. आणि तुम्ही म्हणता तशी जाहिरात आली नाही. हे बघा मी तुम्हाला सांगतो. ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नौकरी करू शकत नाही.
यावर ती युवती म्हणाली की, नाही सर, पाच वर्षांपासून हे प्रक्रिया रखडली आहे. यावर केसरकर म्हणाले की, हे बघा तुम्ही मुलांना कसं शिकवणार ? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे. यावर ती युवती म्हणाली की, रजिस्ट्रेशन झाले सर पण पुढच्या प्रोसेससाठी किती वाट आम्ही बघायची ? यावर मंत्री केसरकर म्हणाले की, तुम्हाला माहित आहे की साईट ओपन झालेली आहे. भरती चालू आहे. एक लक्षात घ्या श्रद्धा आणि सबुरी. आजपर्यंत पाच वर्षांत तुमची भरती कुणी केली ? मी केली ना.
माझी एक महत्त्वाची मुलाखत चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येता. आणि एवढं बेशिस्त वर्तन. माझी मुलाखत चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही ? एक लक्षात घ्या. मी जेवढा प्रेमळ आहे तेव्हढाच मी कडकसुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या नौकरीची चिंता असते. त्यासाठी मी ३० हजार नौकर्या उपलब्ध करून दिल्या आहेत. पण उद्या जर मुलांना तुम्ही ही बेशिस्त शिकवणार असाल ते मला अजिबात मान्य नाही.
मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजे. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व. विद्यार्थी म्हणजे काहीच नाही. हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा महाराष्ट्राचा येणारा भवितव्य आहे. महाराष्ट्राचं भवितव्या या मुलांमध्ये आहे. आणि ती मुलं चांगली झाली तर माझा महाराष्ट्र घडणार आहे. याच्यावर माझा विश्वास आहे. याच्यापुढे अजिबात मध्ये बोलायचे नाही. अजिताबात मध्ये बोलायचं नाही. नाहीतर मी तुमचं नाव घेवून डिस्कॉलिफाय करायला लावेल, असंही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe