छत्रपती संभाजीनगर
Trending

६७ जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल ! वाळूज, नारायणपूर, जोगेश्वरीत महावितरणची मोठी कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ : वाळूज, नारायणपूर व जोगेश्वरी परिसरात महावितरणने राबवलेल्या धडक मोहीमेत ६७ नागरिक घरगुती वापरासाठी लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करताना आढळले. या सर्वांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने वाळूज परिसरातील वीजचोरांत खळबळ उडाली आहे.

वाळूजच्या विजयनगर वसाहतीतील गौतम छबुराव पठारे, हिराबाई कपूरचंद राजपूत, बापूसाहेब नमोजी शेजूळ, राजू साळूबा साळवे, भीमाबाई एकनाथ जाधव, बशीर चाँदखान पठाण, मंगल सुरेश पवार, संगीता एकनाथ मावस, पूनमचंद गुलाबसिंग राजपूत, मुक्तार उस्मान शेख, त्रिंबक कडूबा कांबळे, देविदास वसंत खरे, विलास मगन हिवाळे यांनी तसेच साठेनगर येथील परीगाबाई हरीचंद्र भुजंग, प्रकाश पंचीराम सातपुते, सुमाया खलील शेख, बाळासाहेब पांडुरंग गायकवाड, युनूस बाबू शेख, श्याम गोविंद काकडे, विजय दादाराव दुशिंग, निर्मला बाबासाहेब बनसोडे, छाया रवींद्र जाधव, उत्तम देविदास जाधव, मनोज तावजी उबाळे, अक्काताई सीताराम काळे, सुनीता बाळू उमाप, कुतुब सय्यद महेबूब, मणिकर्णिका चिंते या सर्वांनी एकूण ७ लाख १० हजार ८० रुपयांची वीजचोरी केली.

साठेनगर वसाहतीतील संजय कचरू भालेराव, मोहंमद भिकन शाह, सागर गंगाधर पंडित, नारायण रघुनाथ उमाप, बीबी उत्तम शेख, संतोष भिकाजी खंडागळे, प्रशांत रावसाहेब खरात, हिरामण सुरेश मावस, नसीब उस्मान शहा, एकनाथ हिरामण मावस, शेख रफिक अहमद, दिलीप किसन जाधव, संजय गोरख बनकर, कांतीलाल जनार्धन पगारे, संजय सुधाकर माने, शेख पाशा खलील, रावसाहेब लक्ष्मण खरात, राजू अब्दुल शाह या सर्वांनी एकूण ४ लाख ४७ हजार २९० रुपयांची वीजचोरी केली.

नारायणपूर येथील गणेश कैलास खरात, जमील नवाब शेख, बबन आनंद साबळे, जाकीर शेख नजीर, मधुकर रामभाऊ खरात, महेबुबलाल चांद शेख, घुऱ्हान जानू शेख, सांडू उस्मान शेख, लक्ष्मीबाई जमदाडे या सर्वांनी १ लाख १ हजार ५२० रुपयांची वीजचोरी केली.
जोगेश्वरीच्या आनंद बुद्ध विहार येथील राहुल रामभाऊ वाघमारे, सुनील महादू रणवीर, बाबासाहेब मारुती काळे, उमेश सुकांजी बहात्तरे, विठ्ठल सूर्यभान भालेराव, उमेश माधवराव घोडके, देवानंद लक्ष्मण रणवीर, सुरेश चंद्रकांत पतंगे, कविता कचरू खिल्लारे, गणपत बुद्धाजी मुनेश्वर, सपना रवी रुपेकर, शुभांगी संदीप पाईकराव या सर्वांनी १ लाख १५ हजार ३२० रुपयांची वीजचोरी केली.

महावितरणच्या वाळूज शाखेचे सहायक अभियंता प्रणीत खंडागळे यांच्या फिर्यादीवरून सर्व ६७ आरोपींवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!