छत्रपती संभाजीनगर येथे ११ ते २३ ऑगस्ट दरम्यान सैन्यभरती मेळावा !
छत्रपती संभाजीनगर दि.२६ – अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती कार्यालय, औरंगाबाद केन्टोन्मेंट मैदान , छत्रपती संभाजीनगर येथे दि.११ ते २३ ऑगस्ट दरम्यान सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे भरती संचालक कर्नल अनूज सिंघल यांनी कळविले आहे.
छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दि.९ जुलै २०२४ रोजी झालेल्या ऑनलाईन सीईई पात्रता चाचणी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्र उमेदवारांचे भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र त्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरुन पाठविण्यात आले आहे.प्राप्त झालेले प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्र यांच्यासह उमेदवारांनी भरती मेळावा स्थळी उपस्थित रहावे,असे कळविण्यात आले आहे.
जिल्हा- तालुकानिहाय भरती प्रक्रियेचे वेळापत्रक याप्रमाणे-
दि.११ ऑगस्ट- सर्व जिल्ह्यातील उमेदवार- अग्निवीर ऑफिस असिस्टन्स , स्टोअर किपर टेक्निकल पदांसाठी. परभणी जिल्ह्यातील उमेदवार- अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१२ -नांदेड-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१३-छत्रपती संभाजीनगर(छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद तालुका)-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१४- छत्रपती संभाजीनगर( पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव,वैजापूर तालुका) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१५-जळगाव(अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगर तालुका) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१६-जळगाव(बोदवड, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुका)- )-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१७- जळगाव(पारोळा,रावेर,यावल तालुका), जालना(बदनापूर, भोकरधन,धनसावंगी आणि जालना) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१८-जालना(अंबड, जाफराबाद,मंठा,परतूर), हिंगोली(सर्व तालुके) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.१९-बुलडाणा(बुलडाणा,चिखली,देऊळगाव राजा,जळगाव जामोद,खामगाव, लोणार,मलकापूर) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
दि.२०-बुलडाणा(मेहकर, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव आणि सिंदखेडराजा) )-अग्निवीर जनरल ड्युटी.
तसेच सर्व जिल्हे अग्निवीर टेकनिकल (ऑलआर्म्स), अग्निवीर ट्रेड्समन ८ वी पास (ऑलआर्म्स)
दि.२१-सर्व जिल्हे अग्निवीर ट्रेड्समन १० वी पास (ऑलआर्म्स)
सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र व बोटांचे ठसे तपासून मगच भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. तसेच वैद्यकीय व शारिरीक चाचणी उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड यादी सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध होईल. या यादीतील उमेदवारांना अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात सेवेसाठी पाचारण केले जाईल. उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, छायाचित्रे इ. सोबत आणावी.
ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक प्रक्रियेने होणार असून भरती करुन देतो असे सांगणाऱ्या बनावट, तोतया व्यक्तिंपासून सावध रहावे व त्याबाबत भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांना तात्काळ कळवावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe