घनसावंगी तालुक्यात स्मशानभूमीवरून वाद पेटला, जिवंत व्यक्ती सरणावर बसला, ३०० जणांचा जमाव ! मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला सरणावरील लाकडाने मारहाण !!
जालना, दि. २ – घनसावंगी तालुक्यातील मं चिंचोली येथे स्मशानभूमीच्या जागेवरू वाद पेटला. एका महिलेच्या मृतदेहावर अंत्यविधीच्या वेळी जमीन मालक सरणावर जाऊन बसल्याने हा वाद चांगलाच चिघळला. दरम्यान, ही माहिती समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी जवळपास ३०० जणांचा जमाव तेथे होता. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच सरणावरील ढिलपीने वार करून जखमी करण्यात आले.
भैय्या अशोक पाईकराव, विलास सुदाम पाईकराव, नितीन पाईकराव, योगेश भोरे (सर्व रा. मं चिंचोली, ता. घनसावंगी, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
रामदास विठ्ठल केंद्रे (वय 38 वर्षे व्यवसाय नोकरी पोना, पोस्टे घनसावंगी जि.जालना) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर नवजीवन हॉस्पिटल जालना येथील स्पेशल वार्डात उपचार सुरु आहेत. पोना रामदास केंद्रे यांनी सांगितले की, घनसावंगी अंतर्गत देवीदहेगाव बीट अंमलदार म्हणून ते कामकाज पाहतात. दिनांक 01/03/2023 रोजी 18.00 वाजेच्या सुमारास पोना रामदास केंद्रे व सफौ हरिचंद्रे दूरक्षेत्र कुंभार पिंपळगाव चौकी येथे हजर होते. त्यांना पोस्टे हजेरी मेजर पोकॉ अंमलदार नवनाथ राऊत यांचा फोन आला व त्यांनी कळविले की, मौजे मं. चिचोली येथे स्मशानभूमी मध्ये मृतदेहावर अंत्यविधी करण्याणावरुन वाद सुरु आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तुम्ही व तुमच्यासोबत चौकीला हजर असलेले अंमलदार तात्काळ चिंचोली येथे पोहोचा, असे सांगिल्याने पोना रामदास केंद्रे व सफौ हरीचंद्रे मौजे चिंचोली येथे पोहोचले. त्यावेळी पोलीस ठाणे घनसावंगी येथून पोकॉ राऊत, पोउपनी मरळ, पोकॉ राठोड, पोकॉ पवार, पोकॉ गायकवाड, पोकॉ वैद्य घटनास्थळी हजर होते.
त्यावेळी मौजे मं. चिचोली येथील घनसावंगी ते कुंभार पिंपळगाव रोडलगत बसस्टँड जवळील मोकळ्या जागेत तसेच रोडवर अंदाजे 200 ते 300 लोकांचा जमाव दिसून आला. मोकळ्या जागेवमध्ये एक बाई व एक माणूस बसलेला दिसला व त्या लाकडाच्या जवळच एका माहिलेचा मृतदेह जमिनीवर ठेवलेला दिसला. त्यावेळी पोलिसांनी लाकडावर बसलेल्या व्यक्ती बाबत व इतर जमनलेल्या लोकांकडे विचापूस केली असता सरणावर बसलेला हा विष्णू खोसे व त्याचे कुटुंब असून सदरची जागी ही त्याच्या मालकिची असल्याचे समजले.
अंत्यविधी साठी आणलेल्या मृत महिलेचे नाव कमलबाई रामभाऊ आधुडे असे होत. त्या ठिकाणी तिचे नातेवाईक नितीन पाईकराव, विलास सुदाम पाईकराव, भैय्या अशोक पाईकराव हे व इतर नातेवाईक होते. तसेच विष्णू खोसे व त्याचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद चालु होता. त्यांचा वाद मिटविण्यासाठी पोलिस, अधिकारी व अंमलदार समजावून सांगत होते. त्याचवेळी तेथे हजर असलेले नितीन पाईकराव म्हणाला की, हे पोलीस वाले खोसे यांची बाजु घेत आहे. त्यांना मारा असे म्हणतांच भैय्या अशोक पाईकराव, विलास सुदाम पाईकराव यांनी तेथील सरणासाठी आणलेल्या लाकडातील ढिलप्या हातात घेवून या पोलीसांना जिवे मारून टाकू असे म्हणून भैय्या अशोक पाईकराव याने पोना रामदास केंद्रे यांच्या डोक्यात लाकडाची ढलपी मारून गंभीर जखमी केले.
त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच विलास सुदाम पाईकराव यांनी कपाळावर लाकडीचा ढिलपी मारून जखमी केले. नितीन पाईकराव व योगेश भोरे (सर्व रा. मं. चिचोली) यांनी अन्य पोलिस अधिकारी व अंमलदारांसोबत लोट-लाट करून शिवीगाळ करुन धमक्या दिल्या. त्यावेळी पोलीस ठाणे घनसावंगी गोपनिय शाखेचे अंमलदार यांनी सदरच्या घटने नंतर पोना रामदास केंद्रे यांना मार लागलेला असल्याने स्टाफच्या मतदीने ग्रामिण रुग्णालय घनसावंगी येथे दाखल केले. तेथे वैद्यकिय अधिकारी यांनी औषध उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी सामान्य रुग्णालय जालना येथे रेफर केले. परंतु पोना रामदास केंद्रे यांना नवजीवन हॉस्टपिटल जालना येथे दाखल केले असुन सद्या त्यांच्यावर उपचार चालू आहे.
याप्रकरणी पोना रामदास केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भैय्या अशोक पाईकराव, विलास सुदाम पाईकराव, नितीन पाईकराव, योगेश भोरे (सर्व रा. मं चिंचोली, ता. घनसावंगी, जि. जालना) यांच्यावर घनसावंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe