छत्रपती संभाजीनगर
Trending

जोगेश्वरीत युवकावर अ‍ॅसिड हल्ला ! भांडण सोडवणे महागात पडले, दोन्ही डोळ्यांना आणि कपाळाला इजा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – पती-पत्नीचे व एका जणाचे भांडण सुरु असताना महिलेने मदत मागितल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. दि. 21/10/2023 रोजी 17.40 वाजेच्या सुमारास जोगेश्वरी M मधील रुबीकोण फार्मूलान्स कंपनी समोर (ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) येथे ही घटना घडली. प्रेम आप्पासाहेब साबळे (वय 18 वर्षे, राहणार जोगेश्वरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे या अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

रमेश निळ (राहणार जोगेश्वरी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात प्रेम आप्पासाहेब साबळे (वय 18 वर्षे, राहणार जोगेश्वरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, यातील फिर्यादी प्रेम साबळे हे त्यांच्या कंपनीतून काम संपवून त्यांच्या मित्रासोबत घरी जात होते.

दरम्यान, यातील फिर्यादी प्रेम आप्पासाहेब साबळे यांच्या ओळखीची महिला हिस तिचा पती व यातील आरोपी रमेश निळ हा भांडत असताना सदर महिलेने फिर्यादी प्रेम साबळे यांना मदत मागितली असता फिर्यादी हे यातील आरोपीस समजाऊन सांगत असताना आरोपीने त्याच्या जवळील असलेल्या बाटलीतील एसिड फिर्यादीच्या चेहऱ्यावर फेकले.

त्यामुळे फिर्यादी प्रेम आप्पासाहेब साबळे यांच्या दोन्ही डोळ्यांना, कपाळावर अॅसिडमुळे इजा झाली. साबळे यांच्या जबाबावरून MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये रमेश निळ यांच्यावर गु.र.नं. व कलम 872/2023, कलम 326 ब IPC प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोउपनि डाके करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!