राजकारण
Trending

महावितरणच्या नोकर भरतीमधील मराठा उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवताहेत ! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा भाजपा सरकारवर हल्लोबोल !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – न्यायालयाची स्थगिती आल्यानंतर जे आम्ही पर्याय दिले होते त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन मधल्या काळात अर्धवट स्थितीत राहिलं त्याच्यामध्ये महावितरणचे काही कर्मचारी आहेत. पीएसआय पदासाठी ज्यांनी परीक्षा दिल्या होत्या त्या सगळ्यांची भरती प्रक्रिया अडकून गेली. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही अधिसंख्य पदं सुपर न्यूमेररिक पोस्ट क्रिएट करून त्यांचा तुम्ही समावेश करून घ्या. मात्र, अजही ही सगळी पोरं मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर चढवला. दरम्यान, सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असून आजच मनोज जरांगे पाटलांनी २५ तारखेपासून आमरण उपोणाचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अशोकराव चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आल्यानंतर अपूर्णावस्थेत असलेल्या अनेक विभागांच्या नोकरभरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदांवर सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता.

मात्र, महावितरणच्या नोकरभरतीमधील मराठा उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पीएसआय पदाच्या भरतीमधील मराठा उमेदवारांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने अशा सर्व उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले..

Back to top button
error: Content is protected !!