छत्रपती संभाजीनगर
Trending

एम्स हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास बेल्टने मारहाण ! झटापट सोडवण्यास आलेल्या पोलिसांच्या वर्दीवरही हात उचलून दादागिरी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – तुमच्या हॉस्पिटलच्या अँम्बुलसच्या गाड्यामुळे मला येथून येण्या- जाणासाठी त्रास होतो असे म्हणून एम्स हॉस्पिटलच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास बेल्टने मारहाण केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस तातडीने पोहोचले. तेथे सुरु असलेली झटापट सोडवण्यास गेलेल्या पोलिसांच्या वर्दीवरही हात उचलण्यात आला. ही घटना टीव्ही सेंटर जवळील एम्स हॉस्पिटलच्या गेटसमोर घडली.

शिवानंद मोरे त्यांचे वडील गजानन मोरे व आई या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुख्य प्रशासकीय अधिकारी विलास लक्ष्मण काळे असे जखमीचे नाव आहे. या मारहाणीत त्यांची दोन बोटे फ्रैक्चर झाली. यासंदर्भातील प्रथम माहिती अहवालानुसार, विलास लक्ष्मण काळे (वय40 वर्षे व्यवसाय नोकरी रा. सारा परिवर्तन हौ.सो. सेक्टर, सांवगी नायगाव रोड छत्रपती संभाजीनगर) हे मागील 10 वर्षांपासून एम्स हॉस्पिटल येथे मुख्य प्रशाकीय म्हणून सध्या नोकरीस आहे.

दि.05/08/2023 रोजी सायंकाळी 18.40 वाजेच्या सुमारास एम्स हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्पिटलचे सेक्युरीटी गार्ड सलिम शाह यांनी मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे यांना सांगितले की एक जण गेट जवळ MH 20 GE 2519 या क्रमाकांची स्कोडा ही येणा-जाणाच्या ठिकाणी लावली असून तो आम्हाला शिवीगाळ करीत आहे. असे कळविल्याने मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे बाहेर यांनी बाहेर येऊन बघितले असता गेटजवळ येणा जाणाच्या ठिकाणी MH 20 GE 2519 या क्रमाकांची स्कोडा चार चाकी गाडी दिसून आली.

त्यात बसलेल्या व्यक्तीजवळ जावून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शिवानंद गजानन मोरे असे असल्याचे सांगितले. मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे हे त्यास म्हणाले की तुम्ही अमच्या सेक्युरीटी गार्डला शिवीगाळ का करत आहे. असे विचारले असता तो व्यक्ती मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे यांना म्हणाला तुमच्या हॉस्पिटलच्या अँम्बुलसच्या गाड्यामुळे मला येथून येण्या- जाणासाठी त्रास होतो असे म्हणून तो गाडीतून खाली उतरला.

मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे यांना शिवीगाळ करु लागला. त्यानंतर त्याने त्याच्या कमरेचा बेल्ट काढून बेल्टने मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे यांच्या उजव्या हाताच्या बोटाला मार लागला. त्यांनंतर त्या ठिकाणी हॉस्पिटलचा स्टॉफ हे भांडण सोडविण्यासाठी आले असता शिवानंद मोरे यांनी त्यांना सुध्दा शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली. त्यांनंतर त्या ठिकाणी शिवानंद मोरे यांचे वडील गजानन मोरे व आई हे आले व त्यांनी सुध्दा शिवीगाळ करून हाताचापटांनी मारहाण केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी पोलिस आले. पोलिसांनी ही झटापट सोडवण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांच्या वर्दीवरही त्यांनी हात उचलला. दरम्यान, या घटनेत मुख्य प्रशाकीय विलास लक्ष्मण काळे यांना औषधउपचारासाठी घाटीत पाठवले. तेथील डॉक्टांरानी त्यांच्या उजव्या हातचे दोन बोटे फ्रैक्चर झाल्याचे सांगितले. मुख्य प्रशासकीय अधिका विलास लक्ष्मण काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस स्टेशनमध्ये शिवानंद मोरे त्यांचे वडील गजानन मोरे व आई या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!