देश\विदेश
Trending

जुन्या पेन्शन योजनेसाठी 20 हून अधिक राज्यांतील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा दिल्लीत एल्गार ! बहुतेक टीव्हीवाल्यांनी बातमी दाबली, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने रामलीला मैदान दणाणले !!

नवी दिल्ली, दि. १- जुनी पेन्शन योजने (OPS) च्या मागणीसाठी 20 हून अधिक राज्यांतील लाखो सरकारी कर्मचार्यांनी केंद्र सरकार विरोधात आज, रविवारी एल्गार पुकारला. दिल्लीतील रामलीला मैदानावर लाखो सरकारी कर्मचारी एकत्र जमले. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे. ज्यामध्ये काँग्रेस शासित राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल राज्यांचा समावेश आहे. याशिवाय महाआघाडी शासित राज्य झारखंड आणि आम आदमी पार्टी शासित पंजाबचाही समावेश आहे. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी काँग्रेस पक्ष करत आहे. दरम्यान, 20 हून अधिक राज्यांतील लाखो सरकारी कर्मचार्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची बातमी बहुतेक न्यूज चॅनलवाल्यांनी दाबल्याने सरकारी कर्मचार्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आम आदमी पक्षानेही जुनी पेन्शन योजनेच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा दिला. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह रामलीला मैदानावर पोहोचले. आम आदमी पार्टीने म्हटले आहे की, “जुनी पेन्शन योजना देशभर लागू करावी. दरम्यान, आंदोलनाच्या मंचावर शेतकरी नेते राकेश टिकैत दिसल्याने या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात टिकैत यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी काळे कृषी कायदे मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडले होते. त्यामुळे या आंदोलनात टिकैत दिसल्यामुळे सरकारी कर्मचार्यांच्या या आंदोलनाला बळ मिळाले आहे.

कॉंग्रेसनेही या आदोलनाला जाही पाठिंबा दिला असून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार दीपेंद्र सिंह हुडा यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून, सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, असेही खासदार हुडा म्हणाले. रामलीला मैदानावर लाखो कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ हुड्डा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

‘दिल्लीच्या रामलीला मैदानावर जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्यासाठी कर्मचारी आणि कामगार संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला आज माझा पूर्ण पाठिंबा आहे. ओपीएस हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. सरकारने या मागण्या मान्य करून ओपीएस लागू करावे. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून लगेच ओपीएस लागू करू. असेही हुडा यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने रामलीला मैदान दणाणले
दिल्लीचे रामलीला मैदान आंदोलनावेळी खचाखच भरले. नॅशनल मूव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीमशी संबंधित संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी मैदानात तंबू उभारण्याची परवानगी दिलेली नाही, तरीही त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. यामुळे जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारची डोकेदुखी बनली असून एवढ्या मोठ्या मतदारांना दुर्लक्षित करून चालणार नाही हे मोदी सरकारला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मोदी सरकार कशा पद्धतीने हाताळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button
error: Content is protected !!