छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

मुख्य व्यवस्थापक संदेश वाघ, दांगोडेसह ८ जणांना बेड्या ठोकल्या ! अजिंठा अर्बन बॅंक घोटाळ्यात एक वर्षानंतर मोठी कारवाई !!

छत्रपती संभाजीनगर, दि. २२- सहकार क्षेत्राला हादरून सोडणार्या अजिंठा अर्बन को.ऑप. बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ८ जणांना अटक करण्यात आली. यामुळे घोटाळेबाजांच्या उरात धडकी भरली असून ठेवीदारांना तब्बल एक वर्षानंतर न्याय मिळण्याच्या प्रक्रियाला सुरुवात झाली आहे.

मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ, सोपान गोविंदराव डमाले, तत्कालीन व्यवस्थापक कल्यान दांगोडे, राजू बाचकर, प्रशांत फळेगावकर, आसाराम दांगोडे, गणेश दांगोडे, ज्ञानेश्वर पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीईओ प्रदीप कुलकर्णी यांना यापूर्वीच २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेवर भारतीय रिझर्व बँकेच्या दि.28.08.2023 च्या आदेशान्वये दि. 29.08.2023 पासून सर्व प्रकारचे निर्बंध घालण्यात त्यानंतर या बॅंकेवर प्रशासक म्हणून सुरेश काकडे यांची नियुक्ती करण्यात आली.

बँकेच्या सर्व ठेवींदारांचे क्लेम (ठेव रक्कम परत मिळण्यासाठी सादर करावयाचा अहवाल) बँकेने विहित कालावधीत म्हणजेच दि. 13.10.2023 रोजी DICGC कडे सादर केला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे वेळ लागल्याचे प्रशासकांचे म्हणने आहे. तत्कालीन प्रशासक सुरेश काकडे आणि DICGC यांच्यामध्ये योग्य व अधिकृत क्लेम्ससाठी पाठपुरावा केला. मात्र, बॅंकेच्या व्यवस्थापकाच्या तुघलकी कारभारामुळे क्लेम येण्यास उशीर झाला व होत आहे. असे असले तरी ५ लाखांपर्यच्या सर्व ठेवीं सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत असल्याचा दावा प्रशासकांच्या वतीने करण्यात येत असून अजून क्लेमची एक यादी येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी क्लेमची यादी केव्हा आणि कोणत्या तारखेला येणार यावर मात्र बॅंक प्रशासनाने चुप्पी साधली आहे.

दोन महिन्यांच्या आत DICGC ला क्लेमची रक्कम देणे बंधनकारक मात्र प्रचंड उशीर- बॅंकेकडून खातेदारांची दावा यादी मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत प्रत्येक ठेवीदाराच्या दाव्याची जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत देण्यास DICGC जबाबदार आहे. योग्य व अधिकृत प्रत्येक विमाधारक ठेवीदाराला त्यांच्या दाव्याच्या रकमेशी संबंधित दाव्याची रक्कम (जास्तीत जास्त ५ लाख रुपये) वितरित करणे DICGCला बंधनकारक आहे. यानुसार बँकेने विहित कालावधीत म्हणजेच दि. 13.10.2023 रोजी DICGC कडे क्लेम दाखल केलेला आहे. यानुसार दि. 12.12.2023 रोजी दोन महिने पूर्ण झाले. अर्थात या बॅंकेच्या खातेदारांची क्लेम यादी मोठ्या प्रमाणात असल्याने व्हेरिफिकेशनसाठी जास्त कालावधी लागत असून बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकांच्या तुघलकी कारभारामुळे उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे ठेवीदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रथम माहिती अहवालानुसार ९७.४१ कोटींचा घोटाळा- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्जाचे वाटप- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा काकडे यांनी उघडकीस आणला आहे. असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें या दोघांना सुरुवातीला अटक केलेली आहे. त्यानंतर उस्मानपुरा, जाधवमंडी येथील दोन शाखा व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील मुख्य सूत्रधार चेअरमन सुभाष झांबड हे अद्याप फरार आहेत.

असुरक्षित कर्जदारांच्या KYCचा शोध सुरु- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर काम करत असून पोलिसांनी बॅंकेतील संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 36 कर्जधारकांना असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आले असून यातील काही कर्जदारांच्या केवायसीच पोलिसांना मिळाल्या नसल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. कर्जदारांच्या या फाईलीचे संपूर्ण रेकॉर्ड मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. असुरक्षित कर्जदारांची KYC सदर्भातील संपूर्ण माहिती पोलिस शोधत आहे.

बॅंकेत एकूण 47 हजार अकाउंट, ३५० कोटींच्या ठेवी- साधारणत: प्राथमिक स्वरूपामध्ये 47 हजार अकाउंट आहेत. ३५० कोटी पर्यंतच्या एकूण ठेवी आहेत. ज्या तारखेला एआयडी लागलेला आहे. त्या तारखेची ही परिस्थीती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट मुदत ठेवी पुन:गुंतवणूक या सगळ्या प्रकारच्या ठेविचा त्यामध्ये समावेश आहे.

Back to top button
error: Content is protected !!