छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

आळंदच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस हैदराबादमधून झडप घालून जेरबंद केले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – पोलीस ठाणे वडोदबाजार हद्दीतील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील मौजे आळंद येथील अल्पवयीन मुलीस त्याने हैदराबाद येथे पळवून नेले होते. पोलिस पथकाने सापळा रचून त्याला हैदराबादमधून जेरबंद केले. नदीम सलीम शेख (रा. आळंद ता. फुलंब्री. जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि १४/०७/२०२३ रोजी मौजे आळंद (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील तक्रारदार यांनी पोलिस स्टेशन वडोदबाजार येथे तक्रार दिली की, त्यांच्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेलेले आहे. या फिर्यादी वरुन पोलिस स्टेशन वडोदबाजार येथे गुन्हा दाखल झालेला होता.

पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदर अल्पवयीन मुलगी ही आरोपी नदीम सलीम शेख (रा. आळंद ता. फुलंब्री. जि. छत्रपती संभाजीनगर) याने हैदराबाद राज्य तेलंगणा येथ पळवून नेलेले आहे. ही खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांनी तात्काळ स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस पथक हैदराबाद येथे पाठवले.

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तेलगंणा राज्यातील हैदराबाद वेशांतर करून आरोपीचा ठावठिकाणा शोधला. तो आदीलशहा कॉलनी परिसरात फिरत असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. आरोपी हा अल्पवयीन मुलीला कोठेतरी घेवून जातांना पोलिसांना दिसला असता त्याच्यावर अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीची त्याच्या ताब्यातून सुटका करून पुढील तपास कामी पोलीस ठाणे वडोदबाजार येथे हजर केले आहे.

ही कामगिरी मनिष कलवानीया, पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ, पोउपनि प्रदिप दुबे, पोहेकॉ संतोष पाटील, पोकों वाघ, पो.कॉ राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप, तसेच पोलिस स्टेशन वडोदबाजारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे, पोउपनि संभाजी खाडे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!