छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

बनावट आधार व पॅन कार्डद्वारे बोगस रजिस्ट्री : चिकलठाणा हद्दीतील 9372 चौरस फूट प्लॉटच्या बोगस रजिस्ट्रीने खळबळ !!

छत्रपती संभाजीनगर : बनावट आधार व पॅनकार्डद्वारे चिकलठाणा हद्दीतील 9372 चौरस फुट प्लॉटच्या बोगस रजिस्ट्रीने खळबळ उडाली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर क्र. 1. यांच्या कार्यालयात हा प्रकार झाल्याने हा अधिक चिंतेचा विषय बनला आहे.

आरोपी :- 1) सागर काळुसिंग राजपुत रा. शिवालय भगवती कॉलनी जवाहर कॉलनी गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर 2) शेख एजाज अहमद अब्दुल रशीद वय 47 वर्ष, धंदा व्यापार, रा. लक्कड मंडी न्यू मोंढा 3) शेख हुजैफा अहेमद शेख एजाज अहेमद वय वर्षे 24 धंदा व्यापार रा.लक्कडमंडी छत्रपती संभाजीनगर 4) युसूफ खान अय्युब खान वय वर्षे 43 धंदा व्यापार रा. रहीमनगर छत्रपती संभाजीनगर 5) एक अनोळखी व्यक्ती – सौरभ मकलेचा नावाच बनावट व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत.

बालाजी ग्यानोबा मादसवार वय 48 वर्ष धंदा सरकारी नौकरी (प्रभारी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 छत्रपती संभाजीनगर क्र.1 रा. देशमुख नगर गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, सौरभ शांतिलाल सकलेचा याची मौजे चिकलठाणा हद्दीतील गट नं. 368 मधील प्लॉट नं. 1 ज्याचे एकूण विक्री क्षेत्र 9372 चौरस फुट म्हणजेच 871 चौरस मीटर नोंदणीकृत ही जागा त्यांच्या मालकीची असताना यातील आरोपी 1 व 2 यांनी सौरभ शांतिलाल सकलेचा या नावाचा बनावट व्यक्ती उभा केला.

त्याचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बनवून तो सौरभ सकलेचा आहे असे भासवून सदरची मिळकत दस्त नं. 3500/2024 अन्वये नोंदवून सदर दस्तावर आरोपी नं. 3 व 4 यांनी दस्त लिहून देणार व लिहून घेणार यांची ओळख पटवून सदर दस्तावर साक्षिदार म्हणून सह्या करून सदरचा दस्त बनावट बनवून शासनाची फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि निवृत्ती गायके करीत आहे.

Back to top button
error: Content is protected !!