सोशल मीडियावरून ओळख करून व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ! मिटमीट्यातील हॉटेल मेडॉजमधील प्रकार !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – सोशल मीडियावरून ओळख करून व लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेल मेडॉज व पीडितेच्या घरी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
राकेश बाबूलाल पांडे (वय-35 वर्षे, रा.राजा बाजार, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपीने फिर्यादी सोबत सोशल मीडियावरून ओळख करून फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून 01 ऑक्टोबर 2022 वेळ 00.00 पासून ते दिनांक 05/07/2024 वेळ 00.00 पर्यंत वेळोवेळी हॉटेल मेडॉज मिटमीटा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच फिर्यादीच्या राहते घरी येऊन फिर्यादीच्या संमती शिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित केले म्हणून गुन्हा दाखल.
याप्रकरणी 366/20 24 कलम 69,79, 351(2), 351 (3) नुसार छावणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि नरळे करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe