महाराष्ट्र
Trending

अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: बेपत्ता मुलीला शोधून ऑनलाईन गुप्ती विक्रीचा बाजार उठवला ! भालगाव, ताडहादगावमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत छापेमारी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – एका बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना त्या मुलीसोबत असलेल्या दोन युवकांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार गुप्ती आढळून आली. त्या दोघांना विश्वासात घेऊन पोलिसांनी गुप्ती ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफास केला. त्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबड पोलिसांंनी सुरुवातीला भालगाव व नंतर ताडहादगावमध्ये छापा टाकण्यात आला. रात्री साडेअकरा वाजता सुरु झालेला तपास पहाटेच्या ४ वाजेपर्यंत छापेमारीत सुरु होता. जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून गुप्त्या जप्त करून चार जणांवर गुन्हा दाखल केला.

1 ) सोमनाथ उर्फ राजु मोहन जोरवाल वय 23 वर्ष रा. ढालसखेडा ता. अंबड जि.जालना, २) परमेश्वर बाबासाहेब नाटकर वय 30 वर्ष रा. ताडहादगाव ता.अंबड जि.जालना यांच्यासह अन्य दोन मुलांवर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक मधुकर त्रिंबकराव पाटील यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 06/07/2023 रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याची मिसिंग तक्रार पोलिस स्टेशन अंबड येथे नोंद करण्यात आली होती. शोध घेत असताना सदरची मुलगी व तिच्या सोबत असलेले दोन तरुण  1) सोमनाथ उर्फ राजू मोहन जोरवाल रा. ढालसखेडा ता. अंबड जि.जालना व 2 ) सतरा वर्षाचा एक मुलगा रा. बोधलपुरा ता. घनसावंगी जि.जालना हे पोलिसांना मिळून आले. त्यांना पोलीस स्टेशन अंबड येथे सदर मुलीसह हजर केले करण्यात आले.

सोमनाथ उर्फ राजु मोहन जोरवाल व एका सतरा वर्षाच्या मुलाची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात प्रत्येकी दोन धारदार लोखंडी शस्त्र गुप्ती मिळून आल्या. सदरची शस्त्रे त्यांनी कोठून मिळवली आहे असे विचारले असता त्यांनी त्यांचा मित्र सतरा वर्षाचा मुलगा रा. भालगाव ता.अंबड जि.जालना हा विक्रीसाठी एका ऑनलाईन कंपनी द्वारे ऑर्डर करून शस्त्रे मागवून घेऊन विक्री करतो, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला. दिनांक 07/07/2023 रोजीच्या रात्री 01.30 वाजता परि पोलीस उपअधिक्षक चैतन्य कदम पोलीस स्टेशन अंबड येथे आले असता त्यांना ही सर्व हकिकत सांगण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने वरील तरुणापैकी सोमनाथ उर्फ राजु मोहन जोरवाल यास सोबत घेऊन रात्री 02.50 वाजता एका सतरा वर्षाच्या मुलाच्या भालगाव येथील घरी छापा टाकला.

त्यास वरील तरुणांनी दिलेल्या माहिती बाबत विचारपूस केली असता त्याने मी माझ्या मित्रांना विक्री करण्यासाठी फोन पे द्वारे एका ऑनलाईन कंपनीस ऑडर देवून प्रत्येकी 1038/-रुपयास एक किमतीची लोखंडी शस्त्र गुप्ती मागवितो व सदर कंपनीचा प्रतीनिधी मी सांगितलेल्या ठिकाणी मला सदरचे शस्त्र पुरवितो अशी माहिती दिली. मी आज पर्यंत पाच गुप्त्या मागितल्या असून त्यापैकी एक गुपती सोमनाथ उर्फ राजु मोहन जोरवाल यास व एका सतरा वर्षाच्या मुलास एक तसेच मामा परमेश्वर बाबासाहेब नाटकर रा.ताडहादगाव ता.अंबड यास एक अशा प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे विक्री केल्या.

त्यापैकी सध्या माझ्याकडे दोन गुप्त्या शिल्लक असल्याचे त्याने सांगितले होते. सदरच्या गुप्त्या पोलिसांनी जप्त केल्या. तसेच परमेश्वर बाबासाहेब नाटकर रा. ताडहादगाव याच्या घरी जावून रात्री 04.15 वाजता परमेश्वर बाबासाहेब नाटकर यास भेटून त्यास वरील प्रमाणे त्याचा सतरा वर्षाचा नातेवाईक याने त्यास विक्री केलेली शस्त्र लोखंडी गुप्ती बाबत विचारणा केली असता त्याने त्याच्या ताब्यातील एक लोखंडी गुप्ती काढून दिली.

Back to top button
error: Content is protected !!