अंबाजोगाई भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना चतुर्भुज ! जमीन मोजणी नकाशासाठी घेतले हजार रुपये !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – जमीन मोजणी नकाशा व संबंधीत कागदपत्रे देण्यासाठी हजार रुपयांची लाच घेताना अंबाजोगाई भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास पकडण्यात आले. ही कारवाई आज करण्यात आली.
मुबारक बशिर शेख (वय 57 वर्षे, व्यवसाय नोकरी, मुख्यालय सहाय्यक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अंबाजोगाई (वर्ग ३)
रा. प्रकाश नगर, लातूर) असे आरोपीचे नाव आहे. २३ जूनला त्यांनी लाच मागितली व २६ जून रोजी त्यांना पंचासमक्ष लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदार यांनी त्यांची बर्दापूर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फी भरुन मोजनी करुन घेतली होती. सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. आरोपी मुबारक बशिर शेख यांनी शासकीय फी वगळता 1000 रुपयांची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वी. बीड येथे तक्रार दिली. त्यावरून सापळा कारवाई केली असता आरोपी मुबारक बशिर शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे 1000 रुपयाची मागणी केली व पंच यांच्या समक्ष रु 1000/- तक्रारदार यांच्याकडून स्विकारताच त्यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – श्री शंकर शिंदे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.बीड, सापळा पथक – पोलीस अंमलदार सुरेश सांगळे,भरत गारदे, संतोष राठोड, नामदेव ऊगले यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe