महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी केंद्र पाड्याकरीता प्रस्तावित, विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा !

पलाटपाडा येथील रहिवाश्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत

Story Highlights
  • पाड्यावरील मुले अंगणवाडी केंद्र उसगाव अंतर्गत समाविष्ट असून या पाड्याकरीता मिनी अंगणवाडी केंद्र महिला व बालविकास विभागामार्फत प्रस्तावित आहे.

मुंबई, दि. 10 : गणेशपुरी, ता.भिवंडी, जि. ठाणे अंतर्गत येणाऱ्या उसगाव पलाटपाडा येथील रहिवाश्यांना आवश्यक मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उसगाव पलाटपाडा येथील आदिवासी समाजाचे नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असल्याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, उसगाव पलाटपाडा हा ग्रामपंचायत गणेशपुरी, ता. भिवंडी अंतर्गत येतो.

या पाड्यात 34 घरे असून त्यापैकी 24 कुटुंबाची घरे उसगाव व पलाटपाडा या दोन्ही ठिकाणी आहेत. ही कुटुंबे उसगाव व पलाटपाडा या ठिकाणी आलटून-पालटून वास्तव्य करत असतात. केवळ 10 कुटुंबच पलाटपाडा येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. या पाड्याला मुख्य रस्त्यास जोडण्यासाठी पक्का रस्ता जिल्हा परिषदेमार्फत प्रस्तावित आहे.

या पाड्यावर विहिरींद्वारे पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. या पाड्यावरील मुले अंगणवाडी केंद्र उसगाव अंतर्गत समाविष्ट असून या पाड्याकरीता मिनी अंगणवाडी केंद्र महिला व बालविकास विभागामार्फत प्रस्तावित आहे. पाड्यावरील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाची (इ. १ ली ते ४ थी) सुविधा जिल्हा परिषद शाळा, उसगाव येथे उपलब्ध आहे. आरोग्य उपकेंद्र उसगाव येथील कर्मचाऱ्यांकडून आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!