छत्रपती संभाजीनगर
Trending

विद्यापीठात तासिका तत्त्वावरील २४५ पदांना मान्यता, ४४ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करणार !

बृहत आराखड्यासह सहा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ निधीतून ४४ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार असून तासिका तत्त्वावरील २४५ पदांनाही मान्यता देण्यात आली आहे.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक शुक्रवारी (दि .दोन) घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेली महत्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे :

दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस,’एआययु’च्या महासचिव डॉ.पंकज मित्तल या प्रमुख उपस्थित होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यावर्षाचा हा दीक्षांत सोहळा असणार आहे. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ व मार्च-एप्रिल २०२२ या परीक्षेतील पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसेच १९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत पीएच.डी प्राप्त करणा-या संशोधकांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल.

दीक्षांत सोहळ्यात सुमारे ६० हजार पदव्यांचे वितरण करण्यात येईल. यामध्ये २९१ पीएचडी, ३२ एमफिल तर ५९ हजार ६४३ पदवी, पदव्युत्तर पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये ३१ हजार ३२० व २८ हजार ३२३ पदव्युत्तर पदवीधारकांचा समावेश आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ निधीतून ४४ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार असून तासिका तत्त्वावरील २४५ पदांनाही मान्यता देण्यात आली. कंत्राटी प्राध्यापकांना २४ हजार रुपये प्रमाणे प्रतिमाह वेतन देण्यात येईल. १० महिन्यांसाठी सदर नियुक्ती राहील लेखी परीक्षा व मुलाखतीचा माध्यमातून या जागा भरण्यात येतील.

शिक्षकेत्तर कर्मचा-यांना रजा रोखीकरण अंतर्गत सेवा निवृत्तीच्या दिवशी एक लाखांऐवजी दोन लाखांची रक्कम देण्याचा प्रस्ताव मंजूर. येत्या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात ’कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नंदु खोब्रागडे यांनी निवेदनाद्वारे ५ लाखांपर्यंत रक्कम वाढवण्याची मागणी केली होती. तर कर्मचारी सेवा गौरव कार्यक्रमात कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी सेवागौरव समारंभात ही मागणी केली होती. आगामी पाच वर्षासाठीच्या बृहत आराखड्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या बैठकीत प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे १८ सदस्य उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!