छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत ६४ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती, आदेश निघाले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिके अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी डोळे लाऊन बसलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ६४ उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी अनुकंपा तत्वावर गट-क व गट-ड संवर्गात एकूण ६४ उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी दिनांक ०९/०३/२०२३ रोजी सर्व उमेदवारांना समक्ष बोलावून त्यांचा कल जाणून घेतला.

त्यानुसार समुपदेशनाद्वारे आवश्यक त्या विभागांमध्ये पदस्थापना देण्यात येणार आहे. सदर उमेदवारांना लवकरच नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील. यामध्ये लिपीक-टंकलेखक१८, लेखा लिपीक-०५, वाहन चालक – ०१, शिपाई – २१, स्मशानभुमी रक्षक – ०१, सफाई कामगार१८ याप्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे.

याप्रमाणे विविध झोन कार्यालयात व विभागात विशेषतः लेखा विभागातील मनुष्यबळ वाढीस मदत होणार आहे, अशी माहिती आस्थापना विभागामार्फत देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!