छत्रपती संभाजीनगर
Trending

बँक ऑफ इंडियातील Star Rays कंपनीच्या खात्यावरील ११० कोटींचा ऑनलाईन दरोडा हाणून पाडला ! बँकेतील डाटा सुरक्षिततेवर मोठा प्रश्न, हॅकर्स क्रिप्टो करन्सीमध्ये वळवणार होते रक्कम !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 21 – कंपनीच्या कॉर्पोरेट बँक खात्यातून 110 कोटी रुपये चोरी करून फसवणुक करण्याच्या तयारीत असलेल्या 6 आरोपीना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली. देवप्रिया हॉटेल (कार्तिकी सिग्नल, छत्रपती संभाजीनगर) या हॉटेलवर रेड टाकून पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले. या सहा जणांच्या टोळीकडे बॅंकेचा डाटा मिळाल्याने बॅंकेच्या डाटा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

यासंदर्भात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर सायबर पोलीस ठाणे येथे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार Star Rays या कंपनीच्या बॅंक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट बँक खात्यात उपलब्ध 110 कोटी रुपये इंटरनेट बैंकींगचा वापर करण्याचा डाव होता. बँकेच्या वेबसाईटद्वारे हॅकरचा वापर करून सदर रक्कम हस्तांतरीत करून त्याचे क्रिप्टो करन्सीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याबाबत पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली होती.

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पंचासह देवप्रिया हॉटेल, कार्तिकी सिग्नल छत्रपती संभाजीनगर येथे सायबर पोलीस स्टेशनच्या टिमने रेड केली असता सदर हॉटेलमध्ये आरोपी । ) शेख इरफान शेख उस्मान वय 23 वर्षे, 2) वसीम इसाक शेख, वय 36 वर्ष, 3) शेख कानीत शेख आय्युब, वय 19 वर्ष, 4) आब्बास युनूस शेख, वय 34 वर्षे, 5) अमोल साईनाथ करपे, वय 25 वर्षे, 6) कृष्णा बाळु करपे, वय 25 वर्षे, हे मिळून आले. त्याना सदर ठिकाणी हजर राहण्याचे कारण विचारले असता समाधान कारक उत्तर दिले नाही.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून मोबाईल फोन व Star Rays कंपनीच्या बँक खात्याची व इंटरनेट बैंकीगची माहीती असलेला दस्तऐवज प्राप्त झाला. आरोपींच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यात आणखी वेगवेगळ्या 20 कॉर्पोरेट कंपन्याच्या बॅंक खात्याची व इंटरनेट बैंकींग बाबतची माहिती दिसून आलेली आहे.

सदर आरोपी हे हॅकरच्या मदतीने Star Rays या कंपनीच्या खात्यावरील रक्कम ट्रान्सफर करून त्याचे क्रिप्टोकरन्सीमध्ये रुपांतर करण्याच्या तयारीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. त्यांच्याकडे असलेले 6 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप व दस्तऐवज जप्त करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन छत्रपी संभाजीनगर शहर येथे माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीना दोन दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, सपोनि अमोल सातोदकर, पोउपनि राहुल चव्हाण, पोउपनि सविता तांबे, पोह संजय साबळे, चंद्रकांत दंडे, रामेश्वर काळे, पोना सुशांत शेळके, पोलीस अंमलदार वैभव वाघचौरे, अमोल देशमुख, सचिन संपाळ, शाम गायकवाड, गोकुळ कुत्तरवाडे, अमोल सोनटक्के, अभिलाश चौधरी, संदिप पाटील, प्रविण कु-हाडे, राम काकडे, मपोना जयश्री फुके, मपोअं छाया लांडगे, कल्पना जांभोटकर, संगिता दुबे व चालक सफौ कांबळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!