पैठण
Trending

पैठण दुय्यम निबंधक कार्यालयातून नकला काढून देतो म्हणून दोन हजारांची लाच घेतली ! संशय आल्याने रक्कम परत करून पसार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – पैठण दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्तच्या नकला काढून देतो म्हणून दोन हजारांची लाच घेतली. त्यानंतर संशय आल्याने रक्कम परत करून पावती आणून देतो म्हणून आरोपी पसार झाला.

इम्रान रशीद सिद्दीकी (वय 35 रा.जोहरी वार्ड पैठण ता.पैठण जि.औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांनी 1991 या वर्षाच्या पाच दस्तच्या नकला मिळण्या करीता दिनांक 02/12/2022 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय पैठण येथे अर्ज दाखल केला होता. आरोपी इम्रान रशीद सिद्दीकी तेथून नकला काढून देतो.

फाईलचे प्रत्येकी 375/-रु प्रमाणे एकूण 1875/- रु.व त्याचा मोबदला म्हणून 500/- एकूण 2375/- रुपयांची मागणी त्याने केली. त्याची वास्तवीक फी 225/- असताना लाच 2150/- स्वीकारली. त्यानंतर त्यास संशय आल्याने रक्कम परत तक्रारदार यास देउन पावती आणुन देतो म्हणुन निघून गेला.

संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, सुदाम पाचोरकर, पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शेख शकील, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.जालना यांनी कारवाई केली.

Back to top button
error: Content is protected !!