कन्नडखुलताबादगंगापूरछत्रपती संभाजीनगरझेडपीदेश\विदेशपैठणफुलंब्रीमहानगरपालिकामहाराष्ट्रमार्केट लाईव्हराजकारणवैजापूरसिल्लोडसोयगाव
Trending

संभाजीनगरमधील अनाधिकृत नळ कनेक्शन पोलिस बंदोबस्तात तोडले ! महानगरपालिकेच्या कारवाईने धडकी !!

औरंगाबाद, दि. १० – औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून औरंगाबाद महानगर पालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली. यादरम्यान मनपाने रविंद्रनगर येथील १४ नळ कनेक्शन तोडले.

औरंगाबाद पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरामध्ये असलेल्या जलकुंभ भरणा-या मुख्य जलवाहिन्या व फिडर जलवाहिन्यांवर असलेल्या अनाधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याबाबत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश आहेत. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने तीन पथक स्थापन केले आहे.

याअंतर्गत झोन क्रमांक-3,4,5 मध्ये पथक क्रमांक-2 कार्यरत आहे. या पथकामार्फत दि.09.12.2022 रोजी झोन क्रमांक 3 अंतर्गत दिल्लीगेट जलकुंभावरुन हत्तेसिंगपुरा जलकुंभ भरणा-या 300 मीमी सि.आय. मुख्य फिडर जलवाहिनी वरील रविंद्रनगर येथील 14 अनाधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

ही कार्यवाही रविंद्र निकम, अतिरिक्त आयुक्त 2 यांच्या नेतृत्वाखाली के. एम. फालक उपअभियंता, भूषण देवरे, अक्षय डुकळे, भास्कर काकनाटे रोहीत इंगळे व पाणी पुरवठा विभागातील इतर कर्मचारी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!