छत्रपती संभाजीनगर
Trending

रिक्षाची कागदपत्रे मागितल्यावरून रिक्षा चालकाने पोलिसांच्या गाडीची काच फोडली !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – पोलिसांनी रिशाचे कागदपत्रे मागितल्याच्या करणावरून सदर रिक्षा चालकाने पोलिसांच्या गाडीची काच फोडून आपला राग व्यक्त केला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी फुटेजची खात्री करून सदर रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सायंकाळी ४.३८ वाजेच्या सुमारास बिबिका मकबरा पार्किंग समोरील रोडवर घडली. सचिन शिवाजी खंडागळे (वय ३६, मूळ रा. सिरसगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर, टॉवर गल्ली, चक्रधर मगरेच्या शेजारी, आंबेडकर नगर, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे.

यासंदर्भात बेगमपुरा पोलिस स्टेशनचे पोशि उमेश ठाकूर यांनी दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, सायंकाळी ४.३८ वाजेच्या सुमारास बिबिका मकबरा पार्किंग समोरील रोडवर ही घटना घडली. यातील आरोपी सचिन शिवाजी खंडागळे यांनी ऑटो रिशाचे कागदपत्रे मागितल्याच्या करणावरून दि 02/07/2023 रोजी 16.38 ते 16.40 दरम्यान पो.स्टे. बेगमपुराची टु मोबाईल क्र. MH 20 CU 0060 या शासकीय गाडीची ड्रायव्हर समोरील काच, ड्रायव्हरच्या बाजुच्या दरवाजाची काच व आरसा दगडाने फोडला.

सदरची घटना पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तपासून खात्री केली आहे. आरोपी सचिन शिवाजी खंडागळे यांनी या प्रकारचे कृत्य करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले असल्याची फिर्याद पोशि उमेश ठाकूर यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून रिक्षाचालक सचिन शिवाजी खंडागळे यांच्यावर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनो कचरे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!